Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

१५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत शासनाचे परिपत्रक व मार्गदर्शक सुचना..!



मुंबई : (प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियामातील कलम ७ नुसार ,१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र, सद्यस्थितीत कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घ्यावी किंवा कसे याबाबत मार्गदर्शनासाठी काही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून शासनाकडे विचारणा करण्यात आली आहे. 

या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि , महाराष्ट शासनाच्या संदर्भाधीन आदेशान्वये कोविड प्रदुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत . सदर बाब विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी कळविण्यात येते कि.महाराष्ट्रात जिल्ह्यातील मागील एक महिन्यातील कोविड रुग्णसंख्या व जिल्ह्याचा तसेच ज्या गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करावयाची आहे तेथील कोविड रुग्णसंख्या या सर्वकष बाबी ध्यानात घेऊन १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी आँ धकारी यांनी आपसात समन्वयाने निर्णय घ्यावा ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्यास कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे परिपूर्ण पालन कस्ज सदर ग्रामसभा घेण्यात यावी. 

असे आदेश असल्याने ज्या गावांमध्ये ग्रामसभा घेणार आहेत तेथील जागृत व सुज्ञ नागरिकांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने विकास आराखडा, १४ व्या व १५ वित्त आयोगातील अनुदानाचा खर्च,अपेक्षित सुधारणा या विषयी प्रश्न उपस्थित करुन गावाच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करावे असे अपेक्षित.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध