Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या विकास गंगेचा प्रवाह शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी संकल्प बद्ध होऊया : आ. काशिराम पावरा




शिरपूर प्रतिनिधी :अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या विकास गंगेचा प्रवाह शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी संकल्प बद्ध होऊया विज्ञान, तंत्रज्ञान सर्व आघाड्यांवर देश आज प्रगतीपथावर आहे.परंतु अतिवृष्टी, महापुर, कोरोनासारखी संकटे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करीत आहेत. या संकटांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देणे त्यांच्या मदतीसाठी प्रत्येकाने पुढे येणे,ही संवेदनशीलता बाळगणे आवश्यक आहे.

एकता, बंधुता या बरोबरच परस्परांशी साहचर्य राखणे हीच स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिवीरांना आदरांजली ठरेल. सकारात्मकता आणि प्रगतीच्या आशेची ज्योत अखंड प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित राहो अशी भावना आ. काशिराम पावरा यांनी व्यक्त केली.येथील भाजपा कार्यालय परिसरात प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. प्रथम भारत माता प्रतिमा पुजन आ. काशिराम पावरा यांचा हस्ते करण्यात आले. तसेच भाजपा कार्यालय नुतनीकरणचा शुभारंभ आ. काशिराम पावरा यांचा हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. 

या प्रसंगी धुळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, शिरपूर मर्चंट बॅन्क चेअरमन प्रसन्न जैन, संजय आसापूरे, नितीन राजपूत,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,रोहीत शेटे, तालुका बुथ रचना समन्वयक सुनिल चौधरी, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे,जितेंद्र सुर्यवंशी, रमेश चौधरी, मुकेश पाटील, मुबीन शेख, संजय चौधरी, राधेश्याम भोई, रविंद्र भोई, बापू लोहार, प्रशांत चौधरी, राजुलाल मारवाडी, विक्की चौधरी, नंदु माळी, रफीक तेली,भालेराव माळी, रविंद्र सोनार, जितेंद्र पाटील, सुभाष राजपूत,श्रीकृष्ण शर्मा, मनोज भावसार, संतोष भोई,रविंद्र राजपुत, सचिन माळी, जगन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध