Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

सुप्रसिद्ध गायक-गीतकार-संगीतकार विष्णू शिंदे यांच्या प्रयत्नाना यश कलावंतांसाठी २८ कोटीच्या कोरोना पॅकेजला मंजुरी...!



गेल्या दीड वर्षा पासून सारा देश कोरोना संसर्गाशी लढा देत आहे.कोरोनाची भयंकर लाट सर्वांनाच त्रासदायक ठरली असताना,कोरोना संसर्गवाढीस रोखण्यासाठी राज्य सरकारने लॅाकडाऊन घोषित केला.त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने जनतेस खूप हाल अपेस्टा सहन कराव्या लागल्या.सरकारने सर्व सांस्कृतिक, धार्मिक उत्सवावर बंदी घातली.गावोगावी होणारे यात्रा जत्रा उत्सव,लग्न समारंभ, जागरण गोंधळ,नामकरण विधी,जन्मदिन सोहळे,किर्तन सप्ताह, सभा सम्मेलने तसेच सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यास मनाई केली.पर्यायाने ह्या सर्व मंगल सोहळ्यात गायन -वादन करून आपली गुजराण करणारे तमाम
लोककलावंत हाताला काम नसल्याने हवालदिल झाले. 

अनेक ज्येष्ठकलावंत कोरोना काळात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूमुखी पडले.अनेकांना पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ती कामे करावी लागली. या भयंकर संकटातून कलावंतांचे परिवार सावरावेत, त्यांना सरकार कडुन आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष- विष्णू शिंदे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते.

संबंधीत मंत्र्यांशीपत्रव्यवहार, गाठीभेटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननिय अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात शेकडो कलावंतांच्या उपस्थितीत गांधी भवन-टिळक भवन येथे बैठकांचे आयोजन करून कलावंतांच्यादुःखांची- अडीअडचणीची जाणीव करून दिल्यानेच राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दव ठाकरे साहेब, राज्याचे सांसकृतिक कार्य मंत्री मा.ना. अमित देशमुख साहेब यांनी ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली आहे.राज्य सरकारने घेतलेल्या ह्या दिलासादायक  निर्णया बध्दल महाराष्ट्रातील तमाम 
लोककलावंतांच्या वतीने सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन !!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध