Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

आर.सी.पटेल विज्ञान महविद्यालयातील तृतीय वर्ष बी.एम.एस.चे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत



शिरपूर प्रतिनिधी:आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.एम.एस. (ई-कॉमर्स) विभागाचा निकाल १०० टक्के लागला.क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ तृतीय वर्ष बी.एम.एस.(ई-कॉमर्स) विभागातील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले.हर्षल संतोष भोई ९.७५.सीजीपीए विद्यापीठात तृतीय,नरेश मनोज अग्रवाल ९.७५ सीजीपीए विद्यापीठात चतुर्थ, प्रवीण दिगंबर शेटेवाणी ९.७१ सीजीपीए विद्यापीठात पाचवा व मण्यार आकीफ अस्पाक ९.६८ सीजीपीए विद्यापीठात पाचवा क्रमांक पटकावला. द्वितीय वर्गातील अक्षय चव्हाण, देवरे धनंजय व भाग्यश्री सुतार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानेेयश मिळविले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. डी. जाधव व डॉ. ए. एम. पाटील, विभागप्रमुख डॉ.ए.एम.पाटील यांनी केले.

सर्व विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.ए.के. मोरे, प्रा.जी.के.बिडे,प्रा.आर.एम.सूर्यवंशी, डॉ.आर.पी.अग्रवाल,प्रा.ए.व्ही. तिर्थाप, प्रा.जे.एम.दोरिक यांचे मार्गदर्शन लाभले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध