Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

बोराडी येथे विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा...!




शिरपुर प्रतिनिधी: तालुक्यातील बोराडी येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचा अध्यक्षतेखाली मा.आमदार काशीराम पावरा होते तर उद्घाटन मा. डॉ. तुषार रंधे (जि.प.अध्यक्ष) यांनी केले. यावेळी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर खाज्या नाईक, देवमोगरा माता, राणी काजल, टंट्या भील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.

बोराडी येथील गाव प्रवेशद्वारापासून ते देवमोगरा माता कॉलनी पर्यंत जागतिक आदिवासी गौरव दिनाची भव्य संस्कृतीक रॅली काढण्यात आली तसेच आदिवासी महामेळावा देवमोगरा चौक चा जागेत पार पडला. यावेळी मा.आमदार काशीराम पावरा यांनी म्हणाले की,आदिवासी युवकांनी व्यसनमुक्त झाले पाहिजे, त्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे, समाजाच्या विकासावर लंक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच अनेक योजना शासना राबविण्यात येत आहे. 

त्यांचा देखील लाभ आदिवासी समाज बांधवांना घ्यावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात आदिवासी वाद्य ढोल, मांदल व पारंपरिक वेशभूषा घालून आदिवासी समाजातील बांधव,युवक -युवती, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ पावरा यांनी तर आभार रमण पावरा यांनी मानले तसेच सर्व कार्यक्रमाचे आदिवासी आयोजन समितीचे आभार जितेंद्र पावरा यांनी केले.

जितेंद्र पावरा - नवागांव (बुडकी) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध