Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हयात पुरेसा पाऊस नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा..! जिल्हाधिकार्यांना निवेदन कृत्रिम पावसाचीही मागणी..!
धुळे जिल्हयात पुरेसा पाऊस नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा..! जिल्हाधिकार्यांना निवेदन कृत्रिम पावसाचीही मागणी..!
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्हयात पुरेसा पाऊस नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांची काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ व शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती सांगितली आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, राज्यात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातलेला असूनही धुळे जिल्हयात मात्र तीन चार आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे.भूईतून निघालेली पिके कोमजू लागली आहेत.जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो,बागायतदार शेतकरीसुध्दा विहिरीतील पाणी तळाला गेल्याने चिंतेत आहे.
जिल्हयात अद्याप एकदाही मसुळधार पाऊस पडला नसल्यामुळे नद्या,नाले,ओढे कोरडेठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आला आहे.त्यामुळे जिराईत आणि बागाईत शेती करणारे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.जिल्हयातील मध्यम,लघु आणि इतर पाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. तीन आठवड्यापासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आभाळात ढगांची गर्दी होत आहे पण पाऊस मात्र पडत नाही.गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने पिके अधिक प्रमाणात कोमजू लागल्याने पिकांची अवस्था नाजूक झाली आहे.
जिराईत आणि बागाईत शेतात जी काही पिके उभी आहेत ती पुरेसा पाऊस नसल्याने रोगराईला सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकरी,शेतमजूर आणि सर्वच चातकसारखी पावसाची वाट पाहत आहेत. एकीकडे शेतीचे हे संकट निर्माण झाले असतांना काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षात स्पष्ट झाले आहे.
राज्यातील शेतकर्यांना दिलास देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. आपण महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून धुळे जिल्ह्यातील ही अवर्षण प्रवण बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि जिल्हयात दुष्काळ जाहिर करण्यात यावा, या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी,विद्यार्थी,व्यावसायिक सर्वांनाच योजनेचा लाभ द्यावा,जिल्हयात कृत्रिम पाऊस पाडण्याचा बाबतीत शासनस्तरावर आपण संवाद साधुन मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी आ.कुणाल पाटील, कार्याध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,मुंबई यांच्यासोबत गुलाबराव कोतेकर, माजी सभापती,कृऊबा धुळे,डॉ.दरबारसिंग गिरासे, जिल्हा सरचिटणीस,जिल्हा काँग्रेस, बाजीराव पाटील, माजी,महीला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार डाॅ.दत्ता परदेशी, सभापती,पं.स.धुळे ,पंढरीनाथ पाटील, मा. गटनेते, पं.स.धुळे,अशोक सुडके, कार्याध्यक्ष,धुळे तालुका काँग्रेस कमिटी, योगेश पाटील, शिरीष सोनवणे, अशोक राजपूत अरूण पाटील,सोमनाथ पाटील, अविनाश महाजन, अर्जून पाटील, बापू खैरनार,सुनिल ठाकरे, जे.डी.पाटील, प्रदिप देसले,शिवाजी अहिरे, दिलीप शिंदे ज्ञानेश्वर मराठे, एन.डी.पाटील,
संतोष राजपूत,झुलाल पाटील, रावसाहेब पाटील, गणेश मधुकर गर्दे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस,राजीव पाटील, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र युवक काँग्रेस,पंकज चव्हाण, तालुकाध्यक्ष, धुळे तालुका युवक काँग्रेस,हर्षल साळुंके, माजी अध्यक्ष, धुळे जिल्हा काँग्रेस,किरण नगराळे,हसन पठाण,आबा गर्दे,आबा पगारे,सागर पाटील,दिनेश महाले,आबा शिंदे,सतिष रवंदळे,विशाल पाटील,
उपसरपंच कुणाल पाटील,अरूण पाटील यांच्यासह शेतकरी व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाला अहवाल पाठवून दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंगसिंग गिरासे यांनी आभार मानले
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर-तालुक्य...
-
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा