Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक खातेप्रमुख लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ



नाशिक( प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराचे दर्शन घडवणारी घटना आज नाशिकमध्ये चव्हाट्यावर आली आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-विर (वय ४४) यांना लाचप्रकरणात चालक व प्राथमिक शिक्षकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ‘एसीबी’ ने तब्बल आठ लाखांची लाच घेताना पकडले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्याचीच परिणिती आजच्या कारवाईत झाली आहे.

श्रीमती वैशाली पंकज विर, (वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक), शासकीय चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले तसेच पंकज रमेश दशपुते (प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी ता. नाशिक) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत. ठाणे येथून शहरात दाखल झालेल्या ‘एसीबी’ च्या पथकाने आज (दि. १०) सायंकाळी आठ लाख रुपये स्वीकारताना त्यांच्या चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्याला लाचेसंदर्भात विचारणा केली असता त्याने थेट झनकर यांचे नाव सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन पथक झनकर यांच्या कार्यालयात धडकले. कार्यालयाचे दार बंद करून श्रीमती झनकर यांची चौकशी सुरु होती.

यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता शिक्षक दशपुते यांनी श्रीमती झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयांची मागणी केली.याबाबत दिनांक २७ अॉगस्टला रोजी श्रीमती झनकर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख रुपये घेण्याचे ठरले.

तसेच पुढील व्यवहार चालक ज्ञानेश्वर सुर्यवंशी याच्यासोबत करण्याचे सांगितले.त्यानुसार चालकास तक्रारदाराकडून आठ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक खातेप्रमुख लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.अनेकांनी याबाबतची खातरजमा करण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध