Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
आचार्य प्र. के. अत्रे जयंती ! १३ आगष्ट !! ज्येष्ठ साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेहबंध !!
आचार्य प्र. के. अत्रे जयंती ! १३ आगष्ट !! ज्येष्ठ साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेहबंध !!
आचार्य प्र. के. अत्रे सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे टिकाकार होते . पण हळूहळू त्यांना बाबासाहेब समजले आणि ते बाबासाहेबांचे कट्टर समर्थक व स्नेही बनले . १९५० साली त्यांनी " म. ज्योतिबा फुले " हा चित्रपट निर्माण केला आणि विशेष म्हणजे याचा शुभारंभ बाबासाहेबांच्या शुभहस्ते केला . त्यावेळी ते असे म्हणाले की " म. ज्योतिबा फुले यांचे खरे वारसदार डॉ बाबासाहेब आंबेडकर च आहेत " म्हणून या चित्रपटाचा शूभारंभ बाबासाहेबांच्या शुभहस्ते होणे हा दुग्धशर्करा योग आहे . या चित्रपटाला राष्ट्रपती चे रजत पदक पारितोषिक प्राप्त झाले . हा चित्रपट बाबासाहेब यांनी आवर्जून पाहिला आपला अभिप्राय पाठविला .
१९५१ साली बाबासाहेबांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला . त्यावेळी आपल्या हातात कोणतेही माध्यम नव्हते . त्या काळात आचार्य प्र. के. अत्रे यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आपल्या " नवयुग " या वृत्तपत्राचा विशेष अंक फोटोसहीत प्रकाशित केला . तो खुप गाजला . अजूनही काही लोकांकडे तो संग्रही आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अत्रे यांचे ऋणानुबंध , प्रेम, जिव्हाळा, आदर आणि वात्सल्य बाबासाहेबांच्या अखेरपर्यंत टिकले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयुष्याच्या शेवटी बाबासाहेबांनी आचार्य प्र. के. अत्रे यांना लिहिलेले पत्र आहे .
४ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी बाबासाहेबांनी दोन महत्त्वाची पत्रे त्यांचे स्वीय सहाय्यक श्री नानकचंद रत्तु यांना लिहून घेण्यास सांगितले. एक आचार्य प्र. के. अत्रे आणि दुसरे श्री. म. जोशी यांना. हे दोघे कॉंग्रेसच्या विरोधी पक्षातील प्रमुख महाराष्ट्रीय नेते होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीवरचे नेते होते. ह्या दोघांनी बाबासाहेब काढत असलेल्या रिपब्लिकन पक्षाला येऊन मिळावे, अशी त्यांना बाबासाहेबांनी त्या पत्रात विनंती केली होती .
दुर्दैवाने त्यानंतर ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले . बाबासाहेबांच्या मुंबई येथील अंत्यसंस्कार ला आचार्य प्र. के. अत्रे आवर्जून उपस्थित होते आणि आपल्या बूलंद आवाजात त्यांनी श्रद्धांजली भाषण करून अक्षरशः जनसागराला हेलावून सोडले . आचार्य प्र. के. अत्रें यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील अग्रलेखांची जी मालिका आपल्या वर्तमान पत्रात लिहिली ती वाचताना आजही रडू येते .
विनम्र अभिवादन !
जय भीम !!
(साभार - डॉ बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर २००९, विकी , श्री राजु परुळेकर व माझ्या वाचनातील आठवणी)
(फोटो - म. ज्योतिबा फुले या चित्रपटाचा शुभारंभ - डॉ बाबासाहेब आंबेडकर , माईसाहेब आंबेडकर , अभिनेता भालजी पेंढारकर , अभिनेत्री सुलोचना , आचार्य प्र. के. अत्रे यांच्या मागे शाहिर अमर शेख , प्रबोधनकार ठाकरे इ.)
(संकलक - नारायण बनसोडे)
पोस्ट१३८२१८-१/२
https://www.facebook.com/Narayan-Bansode-PAGE-302410210293103/
Pl. follow this link for more posts and like page & share posts .
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
शिरपूर तालुक्यातील तोदे गावातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत सतत पाऊस चालू असल्याकारणाने अखेर रात्री अचानक कोसळली.सु...
-
शिरपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक दोंडाईचा यांच्या...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील श्री महेंद्र गोकुळ पाटील ( सोनू फौजी)* यांच्या देश सेवा निवृत्त निमित्त आज दि 27 रोजी गागेश्वर महादेव मंद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा