Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

अहिराणी भाषेतील प्रथमच 'दिलीप केदार कॉमेडी शो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला




नुकतेच अंधेरी येथे टी. के. प्रोडक्शन स्टुडीओ प्रस्तुत 'दिलीप केदार कॉमेडी शो' चे पोस्टर, प्रोमो व युट्यूब चॅनल चे उद्घाटन सुप्रसिद्ध बॉलीवूड कॉमेडीयन कींग जॉनी लिव्हर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ' दिलीप केदार कॉमेडी शो' चे निर्माते व दिग्दर्शक दिलीप केदार साहेब, डिओपी जय तारी सर, ज्युनियर अनिल कपूर आरीफ खान व दिलीप केदार कॉमेडी शो चे सर्व कलाकार उपस्थित होते. सदर शो मध्ये निर्माता दिग्दर्शक दिलीप केदार साहेब, मुंबई, भटू चौधरी सर, धुळे, मनोहर खैरनार, हिसाळे, हेमंत पाटील, जळगाव, शुभांगी वाडीले, जळगाव, माधुरी खोंडे, धुळे व माधवी छाईलकर, धुळे यांचाही समावेश आहे. 
  
जॉनी लिव्हर साहेब यांच्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, जॉनी साहेबांनी त्यांचे काही अनुभव उपस्थित सर्व कलाकारांना शेअर केला. 

जॉनी साहेब यांनी पोस्टर चे उद्घाटन केले व दिलीप केदार व सर्व कलाकार टीम ला या शो साठी शुभेच्छा दिल्या. 

सदर शो हा येत्या २१ अॉगस्ट रोजी 'दिलीप केदार कॉमेडी शो' या नावाने असलेले युट्यूब चॅनल वर प्रसारीत करण्यात येणार आहे त्या साठी या शो चे निर्माते व दिग्दर्शक दिलीप केदार साहेब यांनी सर्व प्रेक्षकांना विनंती केली आहे की सदर चॅनल लाईक, शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध