Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

"शिक्षण आपल्या दारी"या प्रक्रियेत सक्रिय सहभाग देणारे शिक्षक..! श्री.यशवंत निकवाडे..!




शिरपूर प्रतिनिधी:कोरोना व्हायरस मुळे अख्ख जग ठप्प पडले.लाखो माणसे मेली,अनेक उद्योगधंदे बुडाले,बेरोजगारी  वाढली,अर्थव्यवस्था पोकळ झाली,
शिक्षणाच्या बट्ट्याबोळ झाला,विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.त्याच्यासारख्या वाईट परिणाम झाला.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री आ.वर्षाताई गायकवाड यांनी  शिक्षण सेतू हा प्रयोग  राबविण्याचे नियोजन केले.

याच वेळेस राज्यातील आदिवासी विकास  प्रकल्पाने पण ह्याच धर्तीवर "शिक्षण आपल्या दारी"हा प्रयोग राबविण्याचे ठरविले.ह्या विभागाने राज्यातील सर्व  आदिवासी आश्रम शिकणा-या विद्यार्थ्यांची व शिकवणा-या शिक्षकांची माहिती  मागविली.त्यांनी एक आराखडा तयार  केला.

आदिवासि विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतो,ते गरीब असतात ,डोंगराळ भागात राहतात म्हणून ते शाळेत येवू शकत नाही म्हणून शिक्षकांनी त्यांच्या घरी जाऊन  अद्यापण करावे ही "शिक्षण आपल्या दारी" प्रक्रिया राबवली.हे अभियान यशस्वी करण्या साठी वर्शी ता.शिंदखेडा येथील माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक श्री  यशवंत निकवाडे हे शिरपूर तालुक्यातील सर्वात शेवटचे डोंगराळ भागातील, मध्यप्रदेशाचा सिमेलगत असणारे अतिशय दुर्गम गाव "गु-हाडपाणी "ईथे जावून  ते अद्यापण करत आहेत. 

त्या गावाला जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना  ते गोळा करतात. एका बांबूनी बनवलेल्या  घरात 2 री ते12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना  अद्यापण करतात.आदिवासी विद्यार्थ्यां शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी  सर प्रयत्न करत आहेत.त्यांचे कार्य खरच प्रेरक असून त्यांच्या ह्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध