Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत गुरुवारी एका मिनिटात हजारो झाडे लावण्यात आली.




अमळनेर प्रतिनिधी:अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत गुरुवारी एका मिनिटात हजारो झाडे लावण्यात आली.महिला,ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी एका दिवसात ११ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत.
     
सरपंच सुषमा देसले यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी महिलांची टीम बनवून गावात ११ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले. ओम च्या मंत्रोच्चारात एकाच मिनिटात हजारो झाडे लावण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्तीसगड चे उद्योगपती दिनेश पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी,छत्तीसगड चे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे संयोजक अजय तिवारी,नगर चे जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे,तालुका कृषी अधिकारी भारत वारे,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ,धुळे पंचायत समितीचे उपसभापती  विद्याधर पाटील,जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील,पाणी फौंडेशनचे सुखदेव भोसले,सरकारी वकील ऍड शशिकांत पाटील,ऍड तिलोत्तमा पाटील,बाजार समितीचे माजी संचालक विजय पाटील, सानेगुरुजी स्मारक समिती कार्यवाह दर्शना पवार,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, भास्कर बोरसे,पोलीस पाटील प्रतिभा पाटील,उपसरपंच सुनील पाटील,सदस्य देवानंद बहारे,बाळू देसले,आशाबाई माळी,वैशाली माळी,रेखाबई पाटील, वर्षा पाटील,मालुबाई माळी,शिवाजी पारधी,
ग्रामसेवक संजीव सैंदाणे,ग्रामरोजगार सेवक भागवत सोनवणे,गुलाबराव बोरसे, प्रफुल भदाणे,दहिवद विकास मंच चे राजेंद्र पाटील,गोकुळ माळी,किशोर जाधव,
नवभारत माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक,शिक्षक विद्यार्थीआश्रमशाळा 
मुख्याध्यापक कर्मचारी,जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक,कर्मचारी, उपकेंद्र दहिवद कर्मचारी,विद्यतू वितरण कर्मचारी,तलाठी ,मंडळ अधिकारी, कर्मचारी,पीक संरक्षक सोसायटी पदाधिकारी हजर होते.उदघाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आले.सूत्रसंचालन सुशील भदाणे यांनी केले व आभार मा.सभापती सुभाष देसले यांनी मानले..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध