Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती- संदीप कुळकर्णी उपजिल्हा अध्यक्ष तर सौ. मनिषा चौधरी जिल्हा सचिव पदावर नियुक्त..!




धुळे: प्रतिनिधी: ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती च्या धुळे उपजिल्हा अध्यक्ष पदावर संदीप बाळकृष्ण कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच धुळे जिल्हा सचिव महिला विभाग या पदावर सौ. मनिषा राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती साठी समितिचे धुळे जिल्हा अध्यक्ष रोहित शिंगाणे यांनी शिफारस केली होती.राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. विनीत राम साळवी तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा.अजिता घोडगांवकर  यांनी ही नियुक्ती दिली आहे. 

ग्राहकांच्या हक्कासाठी आणि ग्राहकांना योग्य तो न्याय देण्यासाठी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती कार्य करत असून, संपूर्ण भारतात ही समिती कार्यरत आहे. सामाजिक आवड असणारे तसेच लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे समाजसेवक यांनी समितीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन समितीमार्फत धुळे जिल्हाध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध