Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

भाजपा आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री




शिरपूर प्रतिनिधि :येथील तहसिल कार्यालयात पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीसाठी मतमोजणी झाल्यानंतर शिंगावे गणातील भाजपाचे उमेदवार चंद्रकांत दामोदर पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यामुळे ते बाहेर पडताच भाजपा पदाधिकाºयांनी एकच जलोष केला़ 

त्यानंतर विजयी उमेदवार आमदार कार्यालयाकडे येण्यासाठी कार्यकर्त्यांसह निघाले असतांना त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्यामुळे त्यांच्यात धुमचक्री झाली. 

अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे गर्दी पांगविली. दरम्यान,या घटनेत शिंगावे येथील उपसरपंच चंद्रकात उर्फ भुरा लोटन पाटील रक्तबंबाळ झाल्याने त्यांच्यासह अन्य ५ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध