Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१



स्वतःच्या कष्टाचे पैशाने खरेदी केलेला शिरढाणे ता धुळे येथील प्लॉट ची नोंदणी ग्रामपंचायत चे कार्यलय मध्ये होऊन , न. न. ८ अ. चा. ग्रामपंचायत चा उतारा मिळणेसाठी ग्रामविकास अधिकारी जयश्री हरीचंद्र पाटील हिने तब्बल ३५,००० रुपये लाच मागितली .ती पण स्वतच्या घरी च लाच घेनेची ग्रामसेविका पाटील बाई ची अजब पद्धत अंगलट आली.स्वतः ग्रामविकास अधिकारी पाटील बाई तर गेल्याच पण लाचेची रक्कम घरी घेऊन मोजत असताना तिचा पती संदीप नथू पाटील हे महाशय जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक असून तेही पत्नीचे सोबत लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले .ग्रामविकास अधिकारी पाटील बाई यांनी पती महाशय याना ही सोबत जेल मध्ये नेण्याचे काम केले अशी ही अजब आणि दुर्मिळ घटना धुळे तालुक्यात घडली आहे.प्लॉट ची नोंदणी साठी ३५,००० रुपये घेत असतील तेव्हा इतर कामात या ग्रामविकास की ग्राम भकास करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी जयश्री पाटील याना तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने जेल मध्ये घातले ही खूप चांगली गोष्ट झाली आहे सरकारी पगार घेनर्या आणि नागरिकांना नाडणाऱ्या अधिकारी कर्मचारी याना नागरिकांनी अशीच अद्दल घडवावी ही नागरिकांची भावना आहे .


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

प्रसिद्ध