Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जानेवारी, २०२५
तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात...
धुळे (प्रतिनिधी)- तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे पेट्रोलपंप उभारणीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती अडीच लाख रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
नंदाणे ता.धुळे येथील गट नं. ५९/३ येथे तक्रारदाराची शेतजमीन असुन या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरीता कंपनीच्या विभागिय व्यवस्थापकांनी दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवकाच्या नावे पेट्रोलपंप उभारणी करीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जावुन सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा केला असता सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. तशी तक्रार आज दि.२४ रोजी तक्रारदार यांनी धुळे लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.या तकारीची धुळे एसीबीने पडताळणी केली असता सरपंच रविंद्र पाटील यांनी व त्यांचेसोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन १ लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ यांचेकडे दिली असता त्यांनी ती स्विकारुन त्यांचे खिशात ठेवुन घेतली. दोघांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा