Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

नांदूरशिंगोटे गावाजवळ मध्यरात्री शिवशाहीला अपघात; महिलेचा मृत्यू; दोघे गंभीर







नाशिक :प्रतिनिधी:नाशिक-पुणे महामार्गावर आज (दि 31) पहाटेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  महामार्गावरील गतिरोधकांचा अंदाज न आल्याने भरधाव बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात आणखी दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पुण्याहून शिवशाही बस नाशिककडे मार्गक्रमण करत होती. संगमनेरहून बसने नाशिकच्या दिशेने प्रयाण केले होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बस संगमनेर घाट ओलांडून एका गतीरोधाकावर आदळली.

याच वेळी भरधाव शिवशाहीच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. अपघाताची माहिती वावी पोलिसांना मिळाल्यानंतर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व स्थानिक तरुणांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध