लोकसभेत अमळनेर मतदार
संघात भारतीय जनता पार्टीला ६० हजार ८३४ मतांचे मताधिक्य
BY ऑनलाईन तरुण गर्जना
१३ ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)
आमदार शिरीष
दादा हे जनसामान्यांचे नेते .
तालुक्यात
सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोन .
जनसामान्यांच्या
मनात राज करणारा नेता म्हणजे शिरीष चौधरी
जनतेत काम करण्यासाठी कोणताच पक्ष नसतो .निवडून येणारा नेताच ज्याच्या कडे विकासाचा वेध व दृष्टीकोन
आहे असाच नेता तालुक्याचा विकास करू शकतो. पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदार यांच्या
स्वभावामुळे ते तालुक्यात लोकप्रिय आमदार म्हणून मतदार संघात ओळखले जावू लागले
.शरीराने बलदंड व पैश्याने समृद्ध असले
तरी त्यांनी सर्वसाधारण जनतेशी वागतांना प्रत्यक्ष त्या गोष्टीचा भाव चेहऱ्यावर येवू
दिला नाही.
२०१४ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर देखिल त्यांनी आपल्या स्वभावात काडी
मात्र देखिल बद्दल केला नाही. तालुक्यातील जनतेशी सवांद साधतांना अरे-रावी अथवा
दादागिरीची भाषा आज पावेतो ऐकण्यात नाही. चरित्र संपन्न असे व्यक्तिमहत्व म्हणजे
शिरीष दादा .शिरीष दादा यांनी वंचित ,दुर्बल ,दिन-दलित घटकांना एकत्र करत
सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला व करत आहेत.अपंगासाठी सुविधा व तळा-गळातील
कितीही गरीब व श्रीमंत व्यक्ती असला तरी वागणे
सारखेच .सर्वसाधारण जनतेला सहज उपलब्ध होणारा नेता म्हणजे शिरीष चौधरी.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा
१८ फुटी अश्वारूढ भव्य पुतळा व महामानव
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून इतिहास रचणारा नेता शिरीष दादा .
२०१४ च्या निवडणुकीत अल्पसंख्याक विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला
होता .त्यात अनिल पाटील यांना भाजपतर्फे ४६ हजार ९१० मते मिळालीत तर राष्ट्रवादीचे साहेबराव पाटील यांना ४३ हजार ६६७ मते
मिळालीत .तर अपक्ष शिरीष दादा यांना ६८ हजार
१४९ मते मिळालीत .मागच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध अल्पसंख्याक असे चित्र
तालुक्यात होते व त्याच बळावर आमदार शिरीष दादा योग्य नियोजनामुळे विजयी झाले
होते.
तालुक्यात २ लाख ९२ हजार ६४२ मतदार
आहेत.त्यात सव्वा लाख मते मराठा समाजाची आहेत.या निवडणुकीत सर्व जाती-समाजाचे लोक
आमदार शिरीष दादा यांच्या सोबत आहेत . राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांचे खास विरोधक
भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील चाणक्य व्ही.आर.पाटील हे यावेळेस शिरीष
दादांचे सारथी आहेत .तालुक्यातील राष्ट्रीय स्वंम
सेवक संघ भारतीय जनता पार्टीचे हमीचे मतदान असल्याने त्याचा देखिल
फायदा शिरीष दादा यांना नक्कीच होईल.
मतदार संघात पक्षाच्या नावाने राजकारण असल्याने पक्षाच्या झेंड्यावर लोक विभागले
गेली आहेत. पक्षाच्या नावानेच राजकारण असून तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे
वर्चस्व आहे.लोकसभेच्या मताचा विचार
केला असता या मतदार संघात भारतीय जनता पार्टीला अमळनेर
शहर ,ग्रामीण व पारोळा ग्रामीण मिळून एकत्र १ लाख
३ हजार ७४७ मतदान मिळाले आहे तर राष्ट्रवादीला ४२
हजार ९१३ मते मिळाली आहेत म्हणजेच भारतीय जनता
पार्टी मतदार संघात ६० हजार ८३४ मतांनी आघाडीवर आहे .
राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टी अशी सरळ लढत असल्याने लोकसभेच्या गणितावरून आज
तरी भारतीय जनता पार्टीच्या मताचे पारडे जड असल्याने विद्यमान अपक्ष आमदार यांचे भारतीय जनता पार्टीच्या
पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याचे संकेत आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा