Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

आमदार अमरिशभाई पटेल यांनी राजपूत समाजाच्या कार्यकर्त्यांची साधला संवाद




शिरपूर  प्रतिनिधी-  शिरपूर तालुक्यात  विधानसभेची रणधुमाळी  सुरू असून आरोप-प्रत्यारोपांची  मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर  संवाद साधण्यासाठी  काल दिनांक  12 रोजी  राजपूत समाजातील  निवडक  कार्यकर्त्यांशी  आमदार अमरीशभाई  पटेल यांनी संवाद साधला. यावेळी  समाजातील अनेक मान्यवर  आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू असून   सोशल मीडिया  च्या माध्यमातून  प्रचार सुरू आहे. निवडणुकीत प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. विचार मांडण्याच्या देखील अधिकार आहे. मात्र हे करत असताना खालच्या पातळीवर जाऊन  वर टीका करणे किंवा त्याला वैयक्तिक रित्या  संबोधन करणे  या गोष्टी वाईट असून  असे प्रकार बंद झाले पाहिजेत  आणि विचारांच्या लढा समोर ठेवून जर काही मतभेद असतील  त्यात  संवाद साधून  आणि  मर्यादांचे भान ठेवून  प्रचार केला पाहिजे  असे मत त्यांनी मांडले. मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही  या तालुक्यातील प्रत्येक समाज माझ्यासाठी माझ्या समाज आहे  त्यामुळे  कोणीही दुराग्रह करू नये अशी विनंती त्यांनी केली. विशेष करून  राजपूत समाजात  विविध  अफवा पसरवल्या जात असून  मी  शिंदखेड्याचे आमदार  नामदार जयकुमार रावल  यांच्या मंत्रिपद  पदाला  विरोध करेल, राजकीय डावपेच  करून   अडचणी निर्माण करेल  असा प्रचार केला जात आहे.  मात्र.  मी माझ्या आमदारकीचा  राजीनामा दिला असून  मी आता आमदार नाही  किंवा कोणत्याही आमदारकीच्या निवडणुकीला देखील  उभा नाही  त्यामुळे  माझ्या मंत्री बनण्याच्या कुठेही काही संबंध येत नाही.  मी या तालुक्याच्या विकासासाठी  हा निर्णय घेतला आहे  आणि यापुढे   भाजप पक्षाच्या   ध्येय धोरणानुसार  पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार आहे  त्यामुळे  कोणीही गैरसमज करू नये  आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी  माझ्या पाठीशी उभे राहून  महायुतीच्या उमेदवाराला  मदत करावी  असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध