Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

नळदुर्ग येथे आरंभ सामाजिक संस्थेतर्फे तुळजापुरला जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा



प्रतिनिधी:नळदुर्ग:विशाल डुकरे 
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे सतत सामाजिक कार्यरत असलेली आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होण्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना राज्यातून पायी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत प्रथमोपचार, आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आले. या प्रथमोपचार केन्द्राचे उद्घाटन पायी चालत जाणाऱ्या महिला भक्तांच्या हस्ते करण्यात आले. अनेक भक्तांच्या पायामध्ये सूज येणे, पाय दुखणे, कंबर दुखणे, सर्दी, ताप, अशा विविध आजारांचा सामना चालत जाणाऱ्याना होतो या रुग्णावर प्रथमोपचार करण्यात आले.

आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सदस्य डॉक्टर सुजय बिस्वास व डॉ आनंद काटकर यांनी अनेक भक्तांना योग्य पद्धतीने सेवा देण्याचे काम केले. त्यामुळे भक्तांच्या वतीने एक प्रकारचा समाधान व्यक्त करताना पाहायला मिळाले. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धिप्रमुख आयुब शेख, मयूर महाबोले, अभिषेक आवटे, सुमित यादगिरी, अभिजीत लाटे, गजानन कुलकर्णी आदी भक्तांची सेवा करत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध