Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

अनिल भाईदास पाटील हे अठरापगड जातीधर्माचे भूमिपुत्र रूपात जनतेचा प्रतिनिधी - मुख्तार खाटीक व बाळू पाटील यांचे आवाहन





प्रतिनिधी :शिवाजी पारधी :अमळनेर विधानसभा निवडणुकीत अनिल भाईदास पाटील हे एका जातीचे नसून अठरापगड जातीचा भूमिपुत्र म्हणून सर्वसामान्य जनतेचा सामान्य प्रतिनिधी निवडणुकीत उभे आहेत. असे मत राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक व राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष बाळू पाटील यांनी आवाहन केले आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित भेटीप्रसंगी खाटीक व पाटील हे विविध समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडी पक्ष हे बहुजन व सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत याठिकाणी विविध जातीधर्माच्या व्यक्तींना संधी मिळते जे अमळनेर शहर हे जातीधर्माचा भेदाभेद मानणारा तालुका नाही याठिकाणी विविध जाती धर्माच्या प्रतिनिधित्व देत आला आहे कधीही जातपात न मानणारा सुशिक्षित वर्ग याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहे. ठराविक लोक या एकीला तोडण्याचे काम करत असून तोडा फोडा राज्य करा हा मार्ग अवलंबत असून त्याला अमळनेरकर कधीही भीक घालणार नाही. आता अठरापगड जाती धर्माचे लोक एकदिलाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचार करत असतांना हा अनुभव तालुक्यात येत आहे. स्थानिक नागरिकांची ही चळवळ इतकी तयार झाली आहे की यंदा भूमीपुत्रच विजयी कसा होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विरोधकांना मुद्दाच उरलेला नाही. आणि येत्या निवडणुकीत अमळनेर नागरिकांनी एकीचे बळ दाखविण्याची तयारी केली असून येत्या 24 तारखेला दिसेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळू पाटील यांनी केले आहे.
यावेळी रणजित भीमसिंग पाटील, भिला पैलवान, गौरव सूर्यवंशी, भूषण भदाणे,  भरत पवार, संभाजी पाटील, इम्रान खाटीक, राजू देशमुख, आबीद शेख, शाकिर खाटीक, भुरा पारधी, पंकज कोतकर रोहित शेखटकर, आबा महाजन, राहुल गोत्राळ, सुनील शिंपी, सनी गायकवाड, काजल शेख, शाहरुख पठाण, उमेश सोनार, पप्पू कलोसे, प्रकाश माळी, सुनील पाटील, संजय महाजन, दिनेश कोठारी, सुरेश भोई, राहुल ठाकूर, प्रमोद बिऱ्हाडे, धनराज भिल, भैय्या गरुड, विजू मास्तर, संदेश पाटील, भूषण बडगुजर, राजू शेख, आरिफ पठाण, दर्पण वाघ, चेतन पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध