शिरपूर - संपूर्ण तालुक्याचा विकास पूर्वी पेक्षा जास्त वेगाने व दुपटीने करणे हे आपले ध्येय आहे. 216 बंधारे बांधून तालुक्यात जलक्रांती केली. उच्च शिक्षण, पाणी, आरोग्य, उद्योग, रोजगार अशा अनेक क्षेत्रात आपण यशस्वी पणे अहोरात्र काम केले.
शिरपूर पॅटर्न ने देशाला राज्याला दिशा दिली. दरवर्षी 6 ते 7 कोटी रुपये खाजगी खर्चातून बंधारे केले. यात थोड्या प्रमाणात शासनाची मदत मिळाली. परंतु, यापुढे अजून 300 पेक्षा जास्त बंधारे, 300 बेड चे हॉस्पिटल, दुर्धर व असाध्य आजारावर उपचारासाठी शासनाचे देखील सहकार्य मिळणार. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे विकासासाठी डबल इंजिन ते आपल्या माध्यमातून जोडणार असल्याने तालुका मोठ्या प्रमाणात सुजलाम सुफलाम होईल. या तालुक्याला सर्व माजी आमदारांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केले.
यासाठी काशिराम पावरा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले.
भाजपा, शिवसेना, आर. पी. आय, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि. 15 मंगळवार रोजी वरूळ, जवखेडा येथे दणदणित जाहीर सभा संपन्न झाली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राहुल रंधे म्हणाले की, अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तालुका जोमाने पुढे जात आहे. सर्वांनी भाजपा महायुतीचे उमेदवार याना निवडावे.
भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, भाजपा मध्ये पक्ष सर्वात श्रेष्ठ आहे. राज्यात एकमेव अमरिशभाई पटेल यांचा हजारोंसह प्रवेश शिरपूर येथील कर्मभूमी मध्ये झाला ही सर्वांसाठी भूषणाची बाब आहे.. भ्रष्टाचार मुक्त असे काशिराम पावरा यांना विजयी करा.
सूत्र संचालन खुशाल पाटील यांनी केले. आभार उपसरपंच नरेंद्र मराठे यांनी मानले.
व्यासपीठावर माजी मंत्री अमरिशभाई पटेल, शिवाजी धनगर, उखा पटेल, वरूळ सरपंच उषाताई शिवाजी भिल, उपसरपंच नरेंद्र मराठे, शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, सुदाम भलकार, डॉ. मनोज महाजन, चंद्रकांत पाटील, हिम्मतराव महाजन, राजू टेलर, यशवंत मराठे, कैलास भामरे, नवेश मराठे, विक्की चौधरी, पंकज मराठे, भरत गिरासे, मोहन राजपूत, लक्ष्मण पाटील, महेश पाटील, सतिष पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र पाटील, स्वप्नील पाटील, कैलास सोनवणे, भरत पाटील, प्रमोद पटेल, भाजप व शिवसेना पदाधिकारी, अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा