Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

तुम्ही भुल द्या मी आँपरेशन करतो:- डॉ जितेंद्र ठाकूर



शिरपूर:प्रतिनिधी : तालुक्यातील जनतेने फक्त भुल द्यावे मि आँपरेशन केल्या शिवाय राहणार नाही.शिरपूर तालुक्यातील आमदारांना शहादा शिरपूर रस्त्याची गंभीरता आजतोवर का दिसली नाही.वरूळ परिसरातील काही गावात पाण्याची भटकंती करावी लागते मात्र आजतोवर फक्त झोपेचे सोंग घेण्याचे काम येथील राजकीय नेत्यांनी केली आहे.

आज दि १४ रोजी शिरपूर तालुक्यातील डॉ जितेंद्र ठाकूर यांची जनाशिर्वाद दौऱ्यादरम्यान जवखेडा व
विखरण ठिकाणी सभा घेण्यात आली होती.यासभेत अमित जैन बोलतांना म्हणाले लोकांची दिशाभूल करून राजकारण करण्याचे काम सुरु आहे. हजारो संख्येच्या लोकांच्या मागणीने डॉ जितेंद्र ठाकूर अपक्ष उमेदवारी करत आहेत.यापुढे तालुक्यात जनतेचा आमदार असणार आहे. यावेळी जवखेडा येथील भाषणात डॉ जितेंद्र ठाकूर हे संबोधित करतांना म्हणाले की, तुम्ही फक्त भुल द्या मी आँपरेशन करतो,आमदारांना शहादा शिरपूर रस्त्याची गंभीरता का दिसत नाही.वरूळ परिसरातील काही गावात पाण्याची भटकंती करावी लागते मात्र आजतोवर फक्त झोपेचे सोंग घेण्याचे काम येथील राजकीय नेत्यांनी केली आहे.३५ वर्षात तालुक्यातील प्रश्न सुटत नसणार तर काय फायदा तालुक्यात सुशिक्षित आमदाराची गरज आहे.तिन महिण्यात साखर कराखाना सुरु करण्याचे आश्वासन देणारे आता शांत आहेत.येथील नेते सत्तेशिवाय राहु शकत नाहीत.तालुक्यात आजतोवर फक्त धोंगी आश्वासन दिले गेले त्यामुळे जनतेच्या मर्जीने अपक्ष लढत आहे.यावेळी वरूळ व विखरण परिसरातील बहुसंख्येने गर्दी सभेसाठी जमलेली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध