देशाचे गृह मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भर प्रचारात लोकांची दिशाभूल करतांना सांगतात शरद पवारानी काय केले ?
BY ऑनलाईन तरुण गर्जना
१४ ऑक्टोबर २०१९
पंकज पाटील (उपसंपादक)
त्या कालावधीत त्यानी काय कामे केलीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच तोंडून ऐका ....’ उघडा डोळे बघा नीट व ऐका लक्ष पुर्वक ’’
आज बदलत्या आर्थिक व्यवस्थेमुळे सर्वात कष्टदायी जिवन शेतकऱ्याचे झाले आहे .जो एका दाण्याचे शंभर दाणे पिकवतो व संपुर्ण जगाला खावू घालतो तोच आज उपाशी व कर्जबाजारी आहे .त्याचा विचार होणे गरजेचे आहे . आजच्या घडीला शरद पवार साहेब यांनी २००८ साली केलेल्या सरसकट कर्ज माफीची गरज शेतकऱ्यांना आहे.त्याच बरोबर शेतीला पाणी व सिंचनाची १०० % अनुदानीत व्यवस्था होणे देखील आवश्यक आहे . सत्ताधारी पक्षाकडे ना तो दृष्टीकोन आहे ना अभ्यास . अभ्यास पुर्ण व्यक्तिमहत्व म्हणजे शरद पवार . सत्ताधारी पक्षाचा कर्ज माफीचा अभ्यास व निकष जनतेला पाच वर्षात चांगलाच कळला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा