Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

तालुका पोलीसांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच,जोयदा गावातून लाखोंचा मद्यसाठा जप्त




शिरपूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य,शस्र तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.त्यातूनच मिळालेल्या गुप्त माहिती वरून तालुक्यातील जोयदा गावात कार्यवाही करून १ लाख ९ हजार किमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशाततुन मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुचा साठा महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या गावांमध्ये पाठविला जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार दि.१८ ऑक्टोबर रोजी दुपारी शिरपूर तालुका हद्दीतील जोयदा गावात छापा टाकला असता सुरसिंग वाहऱ्या पावरा याने त्याच्या घरात देशी विदेशी मध्यप्रदेश निर्मिती इम्पेरियल रियल ब्ल्यू,रॉयल टॅग व टॅंगो पंच नावाचा सुमारे १लाख ९ हजार ५१६ रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला आहे. तो दारुसाठा तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चालक पोलीस शिपाई योगेश गोविंद कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवलदार वानखेडे करीत आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ,शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील,पीएसआय दीपक वारे,पोलीस लक्ष्मण गवळी, प्रकाश मोरे,संजय माळी, संजीव जाधव, योगेश दाभाडे ,गोविंद कोळी यांनी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध