Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या सभेला हजारो संख्येने लोटला जनसागर.... नेत्यांविरूध्दच्या लढाईत विजय जनतेचाच होणार :- डॉ जितेंद्र ठाकूर




शिरपूर:प्रतिनिधी : उमेदवार आहे कोण आणि जाहिरनामा देत कोण?विधानसभेत आजतोवर एकही प्रश्न न विचारणारे आमदारांनी शहराचा काय विकास केला?शहरातील अनेक भागातील विकास आजतोवर झालेला नाही.शिरपूर येथे डॉ जितेंद्र ठाकूरांच्या सभेत हजारो संख्येचा जनसागर उसळला होता.

दि १८ रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांची शिरपूर शहरातील कपडा बाजार येथे जनाशिर्वाद सभा घेण्यात आली होती.यावेळी सभेत हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी चंदनसिंग राजपूत बोलतांना म्हणाले की, शिरपूर शहरासाठी हाँकर्स झाँन आजतोवर नगरपालिकेने केलेले नाही.८ वर्षा पुर्वी दवाखान्याचे भुमिपुजन केले मात्र अद्याप हाँस्पीटल सुरु केले नाही.फक्त निवडणूक आली का दवाखान्याचे आमिश दिले जाते.शिरपूर नगरपालीकेने दुकानाचा,पाणीचा,घराचा कर वाढवला,शहरातील व्यापारी हैराण आहे.




यानंतर डॉ जितेंद्र ठाकूर बोलतांना म्हणाले की,आमदारांनी स्वताच्या विकासाचा जाहिरनामा द्यावा.उमेदवार आहे कोण आणी जाहीर नामा दाखवतात कोणाचा?लोकशाही दाबण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा एक लाख पर्यंतचा विमा देणार,तालुक्यात रोजगार निर्मितीचे काम करायचे आहे,शेवटपर्यंत विकास होणे गरजेचे आहे.शहरात दिड कोटी निधी आणून विकास केला.शिरपूर बसस्थानकासाठी १२ कोटी मंजूर करून आणलेत.शहरात असंख्य प्रश्न आहेत. इंदिरा मेमोरियल हाँस्पीटल मध्ये मेडिकलकलचे बाजारीकरण केले आहे.तालुक्यात डेंग्युने थैमान केले आहे.जनतेच्या सेेेवेसाठी दवाखान सुरु करायचा असेल तर इंदिरा मेमोरियल दवाखान्याला सरकारी दवाखाना करावा. शहरात अद्याप विकास झालेला नाही. ईदगा नगर भागातील लोकांना नाल्या जवळ रहावे लागत आहे.क्रांतीनगर भागात संरक्षण भिंत बांंधण्यात आलेली नाही जिव मुठीत घेवून येथील कुटूंब जगत आहेत.३५ वर्षात एक प्रश्न विधानसभेत मांडला नाही आणी आम्ही केलेल्या विकासावर स्वताचे बँनर लावतात.यावेळी सभेत हजारो संख्येने जनसैलाब सभेसाठी उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध