Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

नंदनगरीच्या नंदपुत्राचे प्रताप


अनिल भाईदास पाटील यांच्यावरील भ्याड हल्ला व चौका-चौकात लागलेले अवैध दारूचे धंदे अमळनेरची जनता विसरलेली नाही ...सचि पाटील 
 
BY ऑनलाईन तरुण गर्जना
   १९ ऑक्टोबर २०१९

पंकज पाटील (उपसंपादक )





‘खरा तो  एकच धर्म , जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना मना-मनात असणाऱ्या परम पुज्य साने गुरुजीची पावन भुमी अमळनेर नगरी.  स्वतःच्या नावावर इंच भर देखिल जमीन न ठेवता दान देणाऱ्या दानवीर श्रीमंत प्रताप शेटजी यांची ही पावन भुमी .


 अमळनेरच्या या पावन भुमीने देशाला शांतीचा संदेश दिला .गेल्या पाच वर्षात जाती-पातीत विष पेरत नंदनगरीच्या दारूपुत्रांनी तालुक्यात या भुमीत भयभीत असे वातावरण तयार केले आहे.नंदपुत्रांनी  जाती-पातीचे विष पेरत २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष आमदारकी मिळवली.पण आमदारकीवर मन भरेल असे नंद्पुत्र कुठे ? त्यांना संपुर्ण अमळनेर तालुक्यात सत्ता काबीज करायची होती . त्यासाठी त्यांनी अमळनेर नगरपालिकेत आपला घरचाच उमेदवाराला उभे करत अमळनेरच्या जनतेच्या व पुढाऱ्यांच्या  हातात झेंडे धरायला दिलेत . तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून आमदारकी दिलेली असतांना सत्तेची लालसा त्यांच्या मनात घर करून गेली .



या अन्यायाविरुद्ध अनिल पाटील यांनी शहर विकास  आघाडीच्या माध्यमातून अमळनेर शहरातील भयभीत झालेले वातावरण संपवण्याचा  प्रयत्न केला . कृषिभूषण यांच्या कार्याचा आदर करत त्यांनी पुष्पलता पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केले. शहर विकास आघाडीला वाढता प्रतिसाद पाहता नंदपुत्रांच्या पायाखालची जमीन सरकली व खुद्द स्वयंम घोषित कार्यसम्राट यांनी  आर.के.नगर परिसरात या पावन भूमीतील  भुमिपुत्र अनिल पाटील यांच्यावर हल्ला केला . तो भ्याड हल्ला अमळनेरची जनता विसरलेली नाही.
नंदनगरीतील या नंदपुत्रांचा प्रताप व  अमळनेर येथील घडलेल्या घटनेचा समाचार  नंदनगरीत असलेले भुमीपुत्र व जनसेवक चंदू भैय्या यांनी घेतला .उघडा डोळे बघा नीट ..ऐका लक्षपूर्वक

अमळनेरच्या नगरीला हे भयभीत वातावरण व जाती-पातीचे विष नको असून अमळनेरच्या जनतेचे ठरले आहे व तालुक्याचे ही ठरले आहे .यावेळेस जनता भुमिपुत्राच्या पाठीशी खंभीर उभे रहात नंदपुत्रांना  घरचा रस्ता दाखवेल हा आत्मविश्वास मला आहे. असे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष  सचिन पाटील म्हणाले.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध