Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार आणण्यासाठी काशिराम पावरा यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा - ना. जयकुमार रावल


 
शिरपूर प्रतिनिधी :उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार आणण्यासाठी काशिराम पावरा यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. शिरपूरचे अमरिशभाई पटेल व सर्वांचे मी भाजपा मध्ये प्रवेशाबद्दल जाहीर स्वागत करतो. आपण सर्वजण देशभक्त आहोत. देशाच्या व राज्याच्या हितासाठी भाजपा महायुतीला मतदान करा. पक्षशिस्त महत्वाची असते. पक्षाने काशिराम पावरा यांना उमेदवारी दिल्याने फक्त त्यांनाच मतदानासाठी सर्वांनी कामाला लागावे. कोणीही संभ्रम बाळगू नये. आपल्या भागातील सर्व 12 जागा विजयी करायच्या आहेत. कोणीही माझ्या नावाचा गैरवापर करुन बंडखेरांना साथ देवू नये. शिरपूर व शिंदखेडा चे आम्ही उमेदवार नं. 1 वर आहोत, आम्ही सोबत विधानसभेत जाणार. अमरिशभाई पटेल यांचे सातत्याने काम आहे. त्यांच्या विकासकामांची चर्चा संपूर्ण राज्यात नेहमीच असते. मी आपल्या खात्या मार्फत भरपूर कामे करुन शिरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी निधी दिला. भावनेच्या आहारी व भूलथापांना बळी न पडता पक्षाचे काम करा. काशिराम पावरा यांना विजयी करुन महाराष्ट्राला बळकट करा असे आवाहन पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी केले.

भाजपा, शिवसेना, आर. पी. आय, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि. 18 शुक्रवार रोजी शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी भव्य मैदानावर दणदणीत जाहीर सभा पार पडली.

यावेळी अमरिशभाई पटेल म्हणाले, देशात व राज्यात चैतन्याचे वातावरण असून भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या आग्रहामुळे मी भाजपा मध्ये आलो. सत्तेसोबत राहून तालुक्याची प्रगती करायची आहे. देशात व राज्यात आदर्श शिरपूर तालुका घडवायचा आहे. शिरपूर पॅटर्न मार्फत पाण्याचे काम, आरोग्य, पिण्याचे पाणी, उच्च शिक्षण, अनेक सुविधा निर्माण केल्या असे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, कि.वि.प्र.संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, हेमंत पाटील, भरतसिंग राजपूत, अनेक मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले.
सुभाष कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.
व्यासपीठावर ना. जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उमेदवार काशिराम पावरा, जयश्रीबेन पटेल, बबनराव चौधरी, तुषार रंधे, भोजेसिंह जमादार, भुपेशभाई पटेल, तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल, राहुल रंधे, हेमंत पाटील, प्रभाकरराव चव्हाण, राजू टेलर, हिम्मतराव महाजन, भरतसिंग राजपूत, नरेंद्रसिंग जमादार, मोहन पाटील, मनोज धनगर, अरुण धोबी, विविध संस्था पदाधिकारी तसेच भाजपा, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, महिला पुरुष, मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध