Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

देशातील व राज्यातील माझ्या कल्पनेतील आदर्श शिरपूर तालुका बनवणार आहे – माजी मंत्री अमरिशभाई पटेल





शिरपूर – नरेंद्र मोदीजी देशाचे आदर्श पंतप्रधान असल्याने देशात व राज्यात चैतन्याचे वातावरण आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेत्यांच्या स्नेहसंबंधामुळे मी भाजपा मध्ये गेलो. भाजपा ने सन्मान पूर्वक व आग्रहाने प्रवेश दिला, त्यामुळे त्यांना धन्यवाद. राज्यभरात भाजपा महायुती शिवाय पर्याय नाही. विरोधकांनी निवडणूकीत चूकीच्या प्रचारातून शिरपूर तालुक्याचे वातावरण खराब करू नका. फार मेहनतीने शिरपूर तालुक्याला चांगले घडविले आहे. शांत, प्रगतशील तालुका असून गेल्या पाच वर्षात सत्तेत नसल्याने विकासात आम्ही मागे पडलो. सत्तेसोबत राहून प्रगती करायची आहे. देशातील व राज्यातील माझ्या कल्पनेतील चांगला

आदर्श शिरपूर तालुका बनवणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी जिरविण्यासाठी गेल्या 15 वर्षात शिरपूर पॅटर्न मार्फत मोठे काम केले आहे. आमदार कसा असावा याचे उदाहरण आपण शिरपूर तालुक्यात निर्माण केले. आरोग्य, पाणी, उच्च शिक्षण, सर्व सुविधानिर्माण केल्या. अनेर नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पातून तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालुक्याला आयुष्यभर पाणी समस्या राहणार नाही. थेंब थेंब पाण्यासाठी इतरत्र वणवण भटकताना लोक दिसतात, परंतु शिरपूर ची स्थिती राज्यात व देशात आदर्श ठरली आहे. कारखाना हा विषय तुमच्यासह माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे. मुख्यमंत्री सोबत बोलून प्रयत्न करेल. बभळाज सरपंचांनी यांनी हृदयापासून काम केले. येथील सर्व शेतकरी बांधव यांचे कौतुक करतो. बभळाज येथील भेंडी, टमाटे, देशभरात माल जातो, हा कौतुकाचा विषय आहे. शेतीसोबत जोड व्यवसाय करा. यापुढे आपण तालुक्याचा दुपटीने विकास करणार आहोत असे अतिशय पोटतिडकीने व भावनापूर्ण भाषणातून माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी काशिराम पावरा यांना निवडून देण्याचे आवाहन केले.





भाजपा, शिवसेना, आर. पी. आय, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि. 14 सोमवार रोजी बभळाज येथे दणदणित जाहीर सभा पार पडली.

यावेळी ॲड. शांताराम महाजन म्हणाले की, बभळाजचे नाव सर्वत्र घेतले जाते ते फक्त अमरिशभाई पटेल यांच्यामुळे. भाई यांनी आपल्या सर्वांसाठी खूप केले आहे, त्याचे उपकार मतदानातून आपण फेडू या. सरपंच जगन्नाथ महाजन यांनी भाजपा महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.
भाजप तालुकाध्यक्ष राहुल रंधे म्हणाले की, अमरिशभाई पटेल यांनी खऱ्या अर्थाने तालुक्याचा मोठाविकासकेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याला पुढे नेण्यासाठी सर्वांनी भाजपा महायुतीला सहकार्य करावे.
भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, राज्यात एकमेव अमरिशभाई पटेल यांचा हजारोंसह प्रवेश शिरपूर येथील कर्मभूमी मध्ये झाला ही सर्वांसाठी गर्वाची बाब आहे. कारखाना बाबत सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कोणीही भूलथापांना बळी न पडता भाजप महायुती सोबत रहावे. भाईंनी मेडिकल फाउंडेशन मार्फत विकास योजना आपल्या दारी राबवून आतापर्यंत 35 हजार रुग्ण तपासणी, 16 हजार मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया व अनेक सुविधा पुरविल्या. भ्रष्टाचार मुक्त असे काशिराम पावरा यांना विजयी करा.

सूत्र संचालन अविनाश पाटील यांनी केले. आभार छोटूसिंग राजपूत यांनी मानले.
व्यासपीठावर माजी मंत्री अमरिशभाई पटेल, ॲड. शांताराम महाजन, सरपंच जगन्नाथ महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, देवेंद्र पाटील, डॉ. मनोज महाजन, चंद्रकांत पाटील, छोटूसिंग राजपूत, विक्की चौधरी, संजय पाटील, प्रल्हाद पाटील, शिवसेना पदाधिकारी नन्ना जाधव, संतोष जाधव, अजमल जाधव, अनिल त्रिभुवन, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, महिला पुरुष, मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध