Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

भोई समाज सेना महाराष्ट्र तर्फे महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा.





प्रतिनिधी :आगामी काळात होऊ घातलेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी व आपली भूमिका जाहीर करण्यासाठी भोई समाज सेना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष भिलेशभाऊ खेडकर तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 आॅक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भोई समाज सेना च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने धुळे येथील बैठक मध्ये जिल्हाध्यक्ष अॅड. योगेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पाचही मतदारसंघातील भोई समाज सेना चे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. बैठकीत धुळे जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर तथा भोई समाजाच्या अडी अडचणी, आरक्षण,मच्छीमारांचे प्रश्न, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात जो पक्ष व जो उमेदवार भोईं समाजाच्या समस्यांचे निराकरण करेल त्याच्या पाठीशी भोई समाज सेना व भोई समाज भक्कमपणे उभा राहिल आणि त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात येईल असा ठराव करण्यात आला होता.  

सर्व बाबी लक्षात घेऊन,  सर्वानुमते धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरले होते.

आज दि. 17/10/2019 रोजी शिंदखेडा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार  माननीय जयकुमारभाऊ रावल  यांना दोंडाईचा येथे भेटून भोई समाज सेना चे पाठिंबा पत्र देण्यात आले व  त्यांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

तसेच शिरपूर मतदार संघात महायुतीचे उमेदवार माननीय कांशीरामजी पावरा यांची शिरपूर येथे भेट घेऊन, माननीय भूपेशभाई पटेल,  तपनभाई पटेल यांच्या समक्ष भोई समाज सेना चे पाठिंबा पत्र देण्यात आले व  त्यांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. 

यावेळी भोई समाज सेना चे संस्थापक अध्यक्ष भिलेशभाऊ खेडकर,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे,  भाऊसो.सुभाष भोई, संतोष भोई, उमेश वाडीले,  संजय तावडे,  अॅड. योगेश मोरे,  रोहिदास ढोले, कैलास वाडीले,  मगन वाडीले,  अशितोष वाडीले,  सरलाल भोई,  राजू भोई,  संदीप  भोई, 

आदी पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध