Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

बोराडी परिसरात प्रचंड गर्दी व उत्साहात भाजपा महायुतीची विजय संकल्प यात्रा





शिरपूर - तालुक्यातील बोराडी परिसरात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आर.पी.आय. (आ. गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणायचे आहे. म्हणून सर्वानी प्रचाराच्या कामाला लागून जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील उमेदवारामधून सर्वात जास्त मतानी भाजपाचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी बोराडी येथील विजय संकल्प यात्रेच्या  शुभारंभ प्रसंगी केले.

बोराडी येथील राममंदिर परीसरात भाजपा, शिवसेना, आर.पी.आय. (आ.गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या विजय संकल्प यात्रा प्रचार रॅली भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, उद्योगपती तपनभाई पटेल यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

यावेळी डॉ. मनोज महाजन, जि.प.सदस्य प्रकाश पावरा, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष रमेश वसावे, दिनेश पावरा, भरत पावरा, भटू माळी, माजी सभापती वसंत पावरा, सखाराम पावरा, जगन पावरा, जयवंत पाडवी, रमन पावरा, खिवल्या पावरा, राजेंद्र पाटील, गुलाबराव मालचे, निलेश महाजन, मोगेश पावरा, दिपक पावरा, दरबार बंजारा, संतोष पावरा, गौतम सोनवणे, भाजपचे पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोराडी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बोराडी सह सातपुडयाच्या लगतच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रसार रॅलीची सुरुवात बोराडी गावातून करण्यात आली. नंतर बुडकी, नवागांव, वाकपाडा, चाकडू, फत्तेपूर, बोरपाणी, मालकातर, मिटगांव, गधडदेव, आंबाडूक, रोषमाळ, रामपूरा, पिप्रीपाडा, टाक्यापाणी, कोडीद, सजगार व चिंचपाणी आदी गावामध्ये विजय संकल्प यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

----------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध