Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

शिंदखेडा मतदारसंघात आघाडीला आज पुन्हा हादरा




निमगुळ येथील सरपंच व झिरवे येथील माजी सरपंच सह शेकडो कार्यकर्त्य भाजपात




प्रतिनिधी :शिंदखेडा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आज पुन्हा हादरा बसला असून, मंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या विकासनशील नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी निमगुळ येथील ग्रांप गटनेते नंदलाल बागल, लोकनियुक्त सरपंच बापू सोनवणे, नंदलाल बागल व झिरवे येथील माजी सरपंच काशीनाथ पाटील सह गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश घेतला.
 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या विकासाच्या व्हिजनला साथ देण्यासाठी मतदारसंघात भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.आज निमगुळ येथील लोकनियुक्त सरपंच बापू सोनवणे, प्रकाश बागल, ग्राम पंचायत गटनेते नंदलाल बागल, संजय बागल,हरीश कुवर, जगन्नाथ बागल, विलास सोनवणे, उदेसिंग भिल, पूनम पवार, रणसिंग सोनवणे, सीताराम चंद्रा तर झिरवे येथील माजी सरपंच काशिनाथ पाटील, निंबा पाटील, नितीन पाटील आदींनी भाजपात प्रवेश घेतला आहे. यामुळे आता झिरवे आणि निमगुळ या गावातील दोन्ही परस्परविरोधी गट एकत्र आले असून मंत्री जयकुमारभाऊ रावल यांना एकमुखी पाठिंबा मिळाला आहे.

 यावेळी माजी सभापती रघुवीर बागल, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, दीपक बागल, हर्षवर्धन बागल उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध