Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

शिरपुरात भाजपातुन अनेकांची हकालपट्टी- जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी




शिरपुर (प्रतिनिधी) भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद दौलत पाटील हिंगोणी यासह अनेकांची पक्षातुन जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी हकालपट्टी केली आहे. धुळे जिल्हातील शिरपुर विधानसभा मतदार संघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम वेचान पावरा यांचा विरोधात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील हिंगोणी, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण महाजन उंटावद, तालुकाध्यक्ष रामेश्वर पाटील हिसाळे, शेतकरी आघाडी जिल्हा सरचिटणीस मनोहर भदाणे करवंद, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पाटील शिंगावे, शिरपुर भाजपा तालुका उपाध्यक्ष सचिन पवार वाघाडी, तालुका चिटणीस किशोर राजपुत मांजरोद, किशोर कोळी टेकवाडे, डाॅ. भागवत देसले सांगवी, अनु. जाती मोर्चा जिल्हा चिटणीस बिज्रलाल मोरे भटाणे, तालुकाध्यक्ष धनराज मोरे भटाणे, शहराध्यक्ष डॅनी चांदे शिरपुर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षश्रेष्ठीशी चर्चा करुन मी त्यांचावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातुन हकालपट्टी करत आहे. आता यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही तसेच शिरपुरातील यापुढे कोणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षविरोधी कारवाया करु नये केल्यास त्यांचावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येवुन पक्षातुन हाकलपट्टी करण्यात येईल. असे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध