Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

लोहारापुञ तसेच समाजभुषण महाराष्ट्र, समाजगौरव महाराष्ट्र, खान्देशपुत्र या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले श्री अर्जुन भोई यांना "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" पुण्यात दांपत्याला प्रदान करण्यात येणार




लोहारा प्रतिनिधी: शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणा-या कर्तृत्ववान शिक्षकामुळेच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होतो म्हणून शिक्षण क्षेत्रात समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर कार्यरत CFTUI या संघटनेशी संलग्न असलेल्या डाँ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 

२०१९-२०चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार लोहारा येथील श्री अर्जुन रामचंद्र भोई यांना पुण्यात डाँ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आंबेडकर रोड पुणे येथे ४ नोव्हेंबर २०१९रोजी देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी श्री अर्जुन रामचंद्र भोई यांची निवड झाल्याचे कळल्यावर गांववासियांना खुप खुप आनंद होत आहे. सदरचा राज्यस्तरीय पुरस्कार हा डाँ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र महासचिव सत्यजित जानराव यांनी पुण्यात प्रसिध्दीस दिले. श्री अर्जुन भोई यांची शैक्षणिक सामाजिक क्षेञातील कामगिरी पाहुन त्यांची निवड झाल्याचे समजते. आमचे लोहारा येथील वृत्तपञाचे वार्ताहर यांच्याशी बोलतांना श्री अर्जुन भोई म्हणाले की, गेल्या १९९८ पासुन शैक्षणिक आणि सामाजिकपातळीवर योगदान देत असुन ते असेच सातत्याने चालुच राहील आणि नविननविन कृतीयुक्त विचार, संकल्पना समोर ठेवल्या जातील व त्यासाठी प्रयत्न ही केले जातील. श्री भोई यांना समाजभुषण महाराष्ट्र, समाजगौरव महाराष्ट्र, खान्देशपुञ, समाजमिञ मध्यप्रदेश, भारतीयस्तरावर समाजसेवी बंधुता या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राज्यस्तरावरुन PMO आँफिसमध्ये पोहचले आहे हे अजुन ही विशेष..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध