Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

संपू दे अंधार सारा!!!!!





संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे....
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी...
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा.........
आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!

शुभ दीपावली*






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध