१४ ऑक्टोबर २०१९
शिवाजी पारधी (प्रतिनिधी )
चोपडा येथील माजी आमदार कैलास पाटील याच्या विजयाची पुनरावृत्ती अमळनेर तालुक्यात होणार .सत्ताधारी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याने भुमिपुत्राच्या पाठीमागे खंभीर उभे रहा .जाती-पातीचे विष पसरविणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा ....

तालुक्यातील प्रत्येक माणूस जो स्वत:ला एकटा समजतो, योग्य विचार करतो, लढण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, तो प्रत्येक जण माझा लढवय्या कार्यकर्ता आहे, तोच नैतिकतेचं निशाण अमळनेरवर फडकावणार आहे.
घड्याळातली योग्य वेळ आता जनतेला समजली आहे.अमळनेर शहर आणि तालुक्याला नैतिकतेचं एक फार मोठं वलंय आहे. यात शांतता प्रिय साने गुरूजी आणि शिक्षणाचा पाया रचणारे श्रीमंत प्रतापशेठजींचा आपण वारसा विसरूच शकत नाहीत. येथील व्यापारी, शेतमजूर, शेतकरी, सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहात होते पण इथे जातीचे विष पाच वर्षापुर्वी चौधरी बंधूनी अमळनेरच्या मातीत रुजवल त्याचे परिणाम आज डोळ्यासमोर आहेत.
सर्वांची एकमेकांशी मैत्री रहावी एक जीवाभावाचं नातं असाव . ते अखंड राहिलं पाहिजे. विचारांची देवाण घेवाण अशीच सुरू राहिली पाहिजे.'आमचं अमळनेर' असं सांगायला त्यांना आवडेल आणि अमळनेर तालुक्याची किर्ती लोक 'आ वासून' ऐकतील असं अमळनेर लोकांना अपेक्षित आहे.
'मनी आणि मसल' पावर दाखवून, पायाखाली सर्वांना दाबून टाकू, सर्वांना आपल्यामागे फिरायला भाग पाडू, पडद्यामागून अवैध धंद्यांना ऊत आणू, अशी घातक विचारसरणी अमळनेरकरांना पचली नाही, पचणार नाही. म्हणून अशा लोकांचं मूळ या पुण्यभूमीवर उगवणार देखील नाही.दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्याने, शेतमजुराने पाठीवर हात ठेवला आणि पाठिंबा दिला तोच आता माझ्यासाठी मोठा आधार आहे. माझ्यामागे तालुक्यातील 'बडे नेते' कुणीच नाहीत, हे खरं आहे. माझा 'बडा घर पोकळ वासा' होणार नाही हे ही स्पष्ट आहे.
आपण मला मतदानाच्या दिवशी न्याय द्याल . घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटण दाबून वाईट शक्तींना सणसणीत वाजवाल अशी अपेक्षा नाहीतर विश्वास आहे .”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा