Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

चोपड्याच्या सेनेच्या विजयात भाजप नेते घनश्याम अग्रवाल ठरले किंगमेकर




चोपडा :प्रतिनिधी :विनोद निकम
जळगाव जिल्हयात चोपडा विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते कारण जिल्ह्यात जळगाव ग्रामीण,पाचोरा नंतर चोपड्यात देखील भाजपने बंडखोरी केली होती आणि त्यातला त्यात भाजप बंडखोर सोबत असलेले सेनेचे माजी आमदार कैलास पाटील व सेनेच्या  माजी महिला जिल्हाप्रमुख इंदिरा पाटील याची सेनेतून थेट मातोश्री वरून हकालपट्टी झाल्या नंतर देखील त्यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे याच्या मागे उभे राहणे पसंत केले होते,मात्र तरीदेखील आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सेनेला सोबत घेत भाजपचे माजी केंद्रीय समितीचे सदस्य घनश्याम अग्रवाल यांना सोबत घेत लता सोनवणे याचेसाठी एकहाती विजय प्राप्त करून विजयश्री खेचून आणली आहे.आमदार चंद्रकांत सोनवणे याना खंबीर साथ देऊन घनश्याम अग्रवाल यांनी लता सोनवणे याच्या विजयात किंगमेकर ची भूमिका बजावल्याची एकच राजकीय चर्चा सध्या तालुक्यात होत आहे.त्यामुळे येणाऱ्या दिवसात तालुक्याच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळणार असून घनश्याम अग्रवाल मित्र मंडळ व चोपडा तालुका शिवसेना याची घट्टपकड दिसून येणार आहे..


निकालानंतर शहरात जल्लोष:--लता सोनवणे यांचा विजयानंतर चोपडा शहरात मेंनरोड वर एकच जल्लोष करण्यात आला असून या जलोश मिरवणुकीत आमदार चंद्रकांत सोनवणे,भाजप नेते घनश्याम अग्रवाल, सेनेचे पदाधिकारी व घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे सक्रिय पदाधिकारी हे दिसून आले.बाजार पेठेत फुलाचा वर्षाव विजयी मिरवणुकीत करण्यात आला होता.
एकमेव उमेदवार माधुरी पाटील होत्या उमेदवार कक्षात:--निकाल ऐकण्यासाठी एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून माधुरी पाटील ह्या उमेदवार कक्षात बसून होत्या मात्र दुसऱ्या फेरीत केवळ २२४ मते मिळाल्याने त्या सकाळी साडे नऊ वाजता बाहेर पडून गेल्या होत्या. दुसरे कोणताच उमेदवार मतमोजणी ठिकाणी फिरकले नाहीत.

कर्णकुटी बंगल्यावर एकच जल्लोष भाजप नेते घनश्याम अग्रवाल याना खांद्यावर धरत पेढे भरवून लता सोनवणे यांचा विजया बद्दल मोठा जल्लोष करण्यात आला.

आमदार चंद्रकांत सोनवणे हे जळगाव हुन चोपड्यात आल्या नंतर प्रथमतः घनश्याम अग्रवाल याच्या पंकज नगर स्टॉप वरील कर्णकुटी बंगल्यावर घोषणा बाजी करून विजयाचा मोठा आनंद साजरा केला. 

यावेळी हजारो कार्यकर्ते हजर होते.यावेळी घनश्याम अग्रवाल यांनी तालुक्यातील जनतेने विकासाला मतदान केल्याचे सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध