Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
नगरसेवकासह चौघांची हत्या ; भुसावळात प्रचंड तणावाचे वातावरण,सर्वत्र तगडा बंदोबस्त
नगरसेवकासह चौघांची हत्या ; भुसावळात प्रचंड तणावाचे वातावरण,सर्वत्र तगडा बंदोबस्त
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकावर अज्ञात आरोपींनी गोळीबार तसेच चाकूने हल्ला करून खून केल्याची काल रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून सर्वत्र तगडा बंदोबस्त लावलेला आहे. आज दुपारी सर्व मयतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते.
रविवारी रात्री हल्लेखोरांनी रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा सुनील बाबूराव खरात यांच्यावर गोळीबार करून गुप्तीने वार केले. हा आवाज ऐकून रवींद्र खरात आणि त्यांचे कुटुंबिय घराबाहेर आले असतांना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. यात रवींद्र खरात यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आला. तर त्यांची मुले जीव वाचवण्यासाठी पळाली असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे हॉस्पीटलजवळ त्यांनाही ठार मारले. मृतांमध्ये नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यात नगरसेवक खरात यांच्या पत्नी रजनी खरात व मुलगा हंसराज देखील जखमी झाला आहे. दरम्यान खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. संभाव्य हाणामारीच्या भीतीने अनेक पालकांनी आज मुलांना शाळेत पाठवलेले नाही. तर पोलिसांनी शहराला जणू छावणीचे स्वरूप दिले आहे. सर्व मयतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा