शेतकरी सदन झाला म्हणजे देश समृद्ध होईल - डॉ.अविनाश पोळ
शेतकरी जगला पाहिजे त्यासाठीच आमचा प्रयत्न असून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातूनच आमची वाटचाल आहे .
७ ऑक्टोबर २०१९
अमळनेर तालुक्यात त्यांनी अंबरीष महाराज टेकडी वर भेट देत वृक्षारोपण केले .त्याच बरोबर टेकडी गृप सदस्य ,मारवड विकास मंच,दहिवद विकास मंच ,पातोंडा विकास मंच ,जवखेडा विकास मंच ,जलदूत व वृक्ष मित्र यांच्याशी मुक्त संवाद साधला .तर तालुक्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत झालेल्या कामांची देखिल त्यांनी पाहणी केली .
- जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून त्याची उत्पादन क्षमता वाढवण्याची कामे करण्यात येणार आहे .सेंद्रिय शेतीकडे वाटचाल .
- शेती पूरक व्यवसाय यासाठी गवत लागवड व जमिनीची धूप थांबवण्यासाठी कार्यक्रम राबविणे .
- वृक्ष लागवड , संगोपन, शेताच्या बांधावरील उपाययोजना यात शेताच्या बांधावर फळ झाडे लागवड करणे .
- पाण्याचा ताळेबंद व ठिबक सिंचनाचे आधुनिक तंत्रज्ञान
- जलसंधारण व शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे
- शेतकऱ्यांचे जिवनमान कसे उंचावेल यासाठी उपाय योजना .
दगडी सबगव्हाण येथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी विविध विषयांवर हात घालतांना शेती मध्ये कश्या प्रकारे जास्तीत-जास्त उत्पादन घेता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून व जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून जमिनीत साठवून ठेवलेल्या पाण्याचा योग्य ताळेबंद करून पिकप्रणाली प्रत्यक्षात शेतीत राबविणे गरजेचे आहे .त्याच बरोबर बांध बंदिस्ती केलेल्या शेताच्या बांधावर गवत लागवड करून शेती पूरक व्यवसायांना चालना दिली पाहिजे . तरुणांनी या आर्थिक मंदीच्या कढीण परिस्थितीत स्वतःला सावरत शेतीचा दैनंदिन ताळेबंद लावत आपल्या खर्चांवर निर्बध घालणे अनिवार्य आहे . सोशल मिडीयाचा उपयोग शेतीविषयावरील ज्ञान संपादन करण्यासाठी केला पाहिजे. व्हाटस अप व फेसबुक हे आपल्या लागलेले व्यसन असून त्यापासून दूर राहिल्याशिवाय प्रगती साधने शक्य नाही.
शेती मध्ये उत्पादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी शेतीतील सेंद्रिय कर्ब वाढवून शेतीत सिंचन व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेतीतील उत्पन्न वाढणार नाही.पाणी फाउंडेशनच्या टप्पा क्र.२ मध्ये याच सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी गावांनी स्पर्धेत स्वतः हून सहभागी होणे गरजेचे आहे . स्वतः साठी विचार करा शेतीकडे एक व्यवसाय ,नौकरी म्हणून बघा यश तुमच्या हातात असेल .संघटीत शेतकऱ्यांचा कुणीही शत्रू नसून त्यांचा पराभव करण्याची ताकद या जगात कुणाकडेही नाही.शेतीला पाणी व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास निश्चितच फायदा होईल .शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही . या देशात फक्त दोनच लोक असे आहेत जे देशाला तारू शकतात ते म्हणजे “ सीमेवर सुरक्षा करणारे जवान व या देशाचा शेतकरी “.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा