ध्येयवेड्या शिक्षकाची आभाळा ऐवढी जिद्द
हमारा गौरव कभी न गिरने में नही है ,
बल्की प्रत्येक बार गिरके उठने में है...
...याच ओळी या ध्येयवेड्या
माणसासाठी
असच.. एक अमळनेर तालुक्यातील व्यक्तिमहत्व ज्यांनी आजपर्यत शेकडो मुलांना
अधिकारी बनवलं त्या ध्येयवेड्या शिक्षकाचा हा जिद्दीचा प्रवास
अमळनेर तालुक्यातील शिरसाळे गावांतील शाळेत शिकवणारा एक सर्वसाधारण
कुटुंबातील शिक्षक.ज्याचा पुर्वाध ज्या
लोकांना माहित आहे त्यांना त्यांच्या आजच्या उतारार्ध पाहून थक्क करून जातो असे ते
व्यक्ती महत्त्व . ज्यानी आजपर्यंत आपली शिरसाळे गावांतील नौकरी सांभाळत गावांतील शेतकरी मायबाप असलेल्या ५८
मुलांना वेगवेगळ्या शासकीय सेवेत स्वतःच्या मार्गदर्शनाने नौकरीला लावले
.त्यांच्या या कार्यामुळे आपण त्यांना खऱ्या अर्थाने गुरु म्हणू शकतो.आज त्यांचे
नाव अमळनेर तालुक्यात शैक्षणिक ,सामाजिक व बौद्धिक चौकटीत अत्यंत आदराने घेतले
जाते.
शिरसाळे गावांत
शिक्षक म्हणून ते काम करत असतांना त्यांनी सन २०१० साली मनाशी एक निश्चय केला .हा
जन्म पुन्हा नाही आतापर्यंत आपण जे जगलो ते फक्त स्वतः पुरत यापुढे समाजाचे आपण
काहीतरी देणे लागतो त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल या निर्धाराने त्यांचा
ध्येयवेडा प्रवास सुरु झाला.
“परंतु सरांच्या मनात
मात्र काहीतरी वेगळेच होते .त्यांना फक्त
पैसा
कमविण्यासाठी शिक्षकी पेशा करायचा नव्हता ,
तर त्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकांसाठी
काहीतरी उपयोगी कार्य करून करायचा होता.”
त्यात त्यांनी स्वखर्चाने गावांत एकाग्रता डेव्हलोप्मेंट पॉईंट नावाने
एक संपूर्णपणे मोफत अभ्यासिका व मार्गदर्शन वर्ग सुरु केला आणि स्वतः ला यात झोकून
देत जिद्दीने हा शैक्षणिक वसा सुरु ठेवला. याचा परिणाम असा होता की
शिरसाळ्यासारख्या छोट्याशा गावातील तब्बल ५८ मुले शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत
नोकरीला लागले, आणि तेही
एकही रुपया न भरता. ही सर्व मुले ही शेतकरी, शेतमजूर,
कष्टकरी कुटुंबातील होती, ज्यांच्या घरात अजून
कोणीही सरकारी नोकरीत नव्हते आज त्यांचे
भाग्य उजळले.
या यशानंतर
आजूबाजूच्या ग्रामीण भागातील तरुणांना या चळवळीचा लाभ घेता यावा म्हणून
तालुक्याच्या ठिकाणी अमळनेरला २०१६ साली पुज्य
साने गुरुजी वाचनालयाच्या मदतीने त्यांच्याच इमारतीमध्ये पुज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र सुरू केले. आजही दर रविवारी न चुकता येथे मार्गदर्शन
वर्ग सुरु असतात.
सामाजिक कार्य -
एवढेच नाही, तर ग्रामीण महिलांच्या प्रबोधनासाठी आदरणीय
काटे सरांसोबतचा 'चालता बोलता' कार्यक्रम...
'अवकाशावर बोलू काही' नावाचा अवकाश
तंत्रज्ञानावरचा माहितीपर व नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ग्रह-ताऱ्यांबद्दलचे
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम...., तसेच अनेक लेखक, वक्ते यांच्या व्याख्यानाच्या नियोजनात हिरीरीने सहभाग, त्यांतले उत्कृष्ट सूत्रसंचालन..., 'स्पर्धा परीक्षा आपल्या दारी' हा
वेगवेगळ्या ग्रामीण भागातील शाळांत घेतला जाणारा करिअर च्या प्रत्येक आयमांना स्पर्श
करणारा उत्कृष्ट कार्यक्रम अशा अनेकविध उपक्रमांतून सरांचे कार्य अविरतपणे चालू
आहे.
वरवर अतिशय सोपे
वाटणारे हे कार्य तितकेसे सोपे नाही. सुरुवातीच्या काळात सरांना खूप काही अडचणी
सहन कराव्या लागल्या. पैसा व पायाभूत सुविधांच्या बाबतीत काही खर्च स्वतःच्या
पगारातून तसेच काही मदत वाचनालय तसेच तत्सम व्यक्तींकडून मिळत गेली, माझ्या अमळनेर तालुक्यात तशी सामाजिक व
शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची साने गुरुजीं पासूनची परंपरा राहिली आहे.
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर,
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..."
प्रमाणे आज अमळनेर
मधील प्रत्येक बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर व्यक्ती, तसेच शासनाच्या विविध विभागात कार्यरत
असलेले अधिकारी या उपक्रमाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत
आणि आपापल्या परीने यात योगदान देत आहेत. त्यात सर्वात पुढे पूज्य साने गुरुजी
वाचनालयाची कार्यकारणी (जुनी आणि नवी दोन्ही), ती आर्मी
स्कुल, आणि सर्वांच्या गुरुस्थानी असलेले एस. ओ. माळी सर
आणि असे अनेक जण (वाचकांना रटाळवाने वाटू नये म्हणून मी सगळ्यांची नावं घेऊ शकत
नाही, पण या सर्वांचे योगदान हे नक्कीच बहुमूल्य आहे), अशा लोकांची साथ नेहमीच सरांना मिळत गेली.
पण काही लोक
टिंगलटवाळी करणारेही होते, ते का होते अजूनही समजत नाही ? कारण सामाजिक क्षेत्रात टीका कधीकधी ठीक
असते पण शैक्षणिक क्षेत्रात टीका का व्हावी ? सरांच्या
हेतूवर शंका असावी बहुतेक. पण आता तशी परिस्थिती नाही, कारण
सातत्याने इतकं चांगलं काम तेही कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता
करत राहिल्याने सरांचा हेतू अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे हे बहुतेकांच्या लक्षात
आलेले आहे. विद्यार्थीसंख्या ही सुद्धा
सुरवातीच्या काळात अडचण होती, सुरुवातीला फक्त ३-४ मुलांना
सलग तीन-तीन तास सातत्याने तेवढेच गुणवत्तापूर्ण शिकवणे... ते दर रविवारी
सगळ्यांची बसण्याची व्यवस्था कशी होईल याची चिंता... हा प्रवासच सरांचा संघर्ष
दर्शवतो.
एक ना अनेक अशा
अडचणींना सामोरे जात सरांनी हा शैक्षणिक वसा आजही तसाच चालू ठेवला आहे.घरातल्या आजरपणाच्या
अडचणीवर देखिल या माणसाने मात करत समाजा समोर आपली अडचण कधीही पुढे न करता हा
ज्ञान दानाचा वसा निरंतर सुरूच ठेवला आहे.
माणुस
स्वार्थाशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही असेच अनेकांना वाटते, परंतु इथे विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की,
सरांचा यात कुठलाही स्वार्थ नाही.
त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही तसेच ते
करणारेही नाहीत, कुठल्याही प्रकारे राजकारणाशी संबंध नाही,
किंवा निवड झालेल्या मुलांकडूनही आजपर्यंत एक रुपया मागितला नाही.
स्वार्थ असला नसला तरी तो फक्त एकच असू शकतो.. तो म्हणजे "समाधान"
फक्त अपेक्षा हीच ज्यांच्या साठी आपण हे मौलिक कार्य केले त्यांनी देखिल त्या
कार्याची जाणीव ठेवावी .त्यासाठी धडपडणाऱ्या
तरुणाईसाठी या पुस्तकाचे लेखक अप्पर आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या
पुस्तकातील ओळी सरांबद्दल आवर्जून सांगाव्या अश्या वाटतात
ज्यांना आपल्या आयुष्यात
काय कराव ..कुठे जांव ...काही कळत नाही .
मार्गदर्शक मित्र भेटत नाही.....!
अश्या असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्याने धीर देणाऱ्या ,
उठून उभ राहण्यासाठी
हात देणारा मार्गदर्शक गुरु आणि
स्वप्न
साकार करण्यासाठी कोणती साधना कशी नी ,केव्हा करायची ,
हेही समजावून सांगणाऱ्या एक सर्वसाधारण कुटुंबातील एक ध्येयवेडा शिक्षक मार्गदर्शक गुरु म्हणजे आदरणीय विजयसिंग पवार सर ज्यांनी अमळनेर तालुक्यात आजपर्यंत शेकडो गरिबांच्या कष्टकरी ,शेतकरी गरिब माय-बाप असलेल्या मुलांना विनामुल्य मार्गदर्शन करत शासकीय सेवेत रुजू केले.
“आज दिवाळी सणानिमित्त त्यांच्या या अलौकिक कार्याचा तरुण-गर्जना टीम ने घेतलेला खारीचा वाटा”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा