Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केला कार्यसम्राट शिरीष दादा यांचा टांगा पल्टी



अमळनेर नगरपालिकेतील नगरसेवक व नगराध्यक्ष अपात्रतेची कुटील राजनीती भोवली

BY ऑनलाईन तरुण गर्जना २७ ऑक्टोंबर २०१९


पंकज पाटील (उपसंपादक)                                                                                                 अमळनेर विधानसभा निवडणूक ही तालुक्यासाठी व जळगांव जिल्हासाठी निर्णायक होती.आ.शिरीष चौधरी यांच्यावर  ऐनवेळी गिरीष महाजन यांनी लादलेली भाजपची उमेदवारी व त्यामुळे भाजप पक्षातील इच्छुकांची नाराजी तालुक्यात दिसून येत होती.
अमळनेर नगरपालिकेत आ.शिरीष चौधरी यांनी कृषिभूषण यांच्या सौभाग्यवती पुष्पलता पाटील यांच्या नगराध्यक्ष पदावर टांगती ठेवलेली तलवार कृषिभूषण साहेबराव पाटील व अमळनेरच्या जनतेला मान्य नव्हती.नगराध्यक्ष पद वाचवण्यासाठी इच्छा नसतांना भारतीय जनता पार्टीत गेलेले कृषिभूषण साहेबराव पाटील यांची अवस्था कुरुक्षेत्रातील भीष्म पितामहः यांच्या सारखी झाली होती.इच्छा नसतांना ते आ.शिरीष चौधरी यांच्या रथावर स्वार झाले होते.त्याच दिवशी अमळनेरच्या जनतेला हे समजून चुकले होते कृषिभूषण हे कार्यसम्राट यांचा रथ (टांगा)पल्टी करतील.
आ.शिरीष चौधरी यांनी अमळनेर तालुक्यातील राजकीय नेत्याचे अस्तित्व संपवण्याची घेतलेली भीष्म प्रतिज्ञा त्यांचेच स्वतःचे राजकीय अस्तित्व संपवायला कारणीभूत ठरली.अमळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदापासून कृषिभूषण यांना दूर करणे ,नगरपालिका निधी सा.बा.विभागाकडे वर्ग करणे ,नारीशक्ती स्मिता वाघ यांचे व खासकरून अमळनेरच्या जनतेचे  खासदारकीचे स्वप्न भंग केले. त्याचबरोबर ज्यांनी त्यांना अमळनेर तालुक्यात पाय ठेवायला जागा करून दिली त्याच उदय वाघ यांचे जिल्हा अध्यक्ष पद काढण्यात देखिल त्यांचा सिंहाचा वाटा होता. आ.शिरीष दादा अमळनेर तालुक्यात निवडून आल्यापासून त्यानी विकासाचे राजकारण कमी व राजकीय नेत्यांचे अस्तित्व संपवण्याचे राजकारण जास्त केले.चढा-ओढीचे राजकारण न करता त्यांनी २०१४ च्या वचननाम्यातील वचनांची जरी पूर्तता केली असती तर त्यांचा पराभव या मातीत करणे   अशक्यच होते.वाचा लक्षपूर्वक हा वचननामा यातील किती गोष्टी पूर्ण झाल्या व किती अपुर्ण राहिल्या .

 विधानसभेच्या रिंगणात उमेदवारी अर्ज भरतांना कृषिभूषण हे कार्यसम्राट शिरीष दादा यांच्या रथाचे सारथी होते व त्याच कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आमदार शिरीष दादा यांचा टांगा पल्टी करत भुमीपुत्र अनिल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण केले .याच चढा-ओढीत वाघांनी देखिल मतांचा पाऊस पाडत स्वतःच्या कार्यक्षेत्रातुन भूमिपुत्रांला लीड देत कार्यसम्राट यांना पंजा मारला.तालुक्यात  खरे स्वाभिमानी ठरलेत कॉंग्रेस पक्षाचे मनोज पाटील व तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे भुमीपुत्राच्या मागे खंबीर उभे राहिले .या निवडणुकीत पक्षाचे संघटन व कार्यकर्त्यांच्या मेहनती बरोबरच ग्रामीण जनतेचा देखिल मोठा वाटा असून विजयाचे शिल्पकार व इतिहास रचिता  ही अमळनेरची जनताच ठरली .या जनतेच्या विश्वासावर भुमीपुत्र किती खरे उतरतात हे येणारा काळाच ठरवेल.आ.शिरीष चौधरी यांचा वचननामा जरी त्यानी प्रत्यक्षात उतरवला तरी एक इतिहास तालुक्यात घडेल .
भुमीपुत्र  निवडून आल्यानंतर कृषिभूषण विजय रथावर स्वार झाले .यालाच अमळनेरच्या भाषेत ‘टांगा पल्टी घोडे फरार’ असे  म्हणतात .कृषिभूषणच आता भुमीपुत्र यांच्या रथाचे खऱ्या अर्थाने सारथी होतील व त्यांना  वाट दाखवत पाडळसरे धरणाचे अमळनेर तालुक्याचे स्वप्न पूर्ण करतील अशी आशा अमळनेरच्या जनतेला आहे.  








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध