Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

जनसंग्रामचा उपक्रम निंभोरा येथे गोर-गरिबांसोबत दिवाळीचा आनंद



प्रतिनिधी :अजीज शेख :रावेर तालुक्यातील निंभोरा,येथे
ऐन दिवाळीच्या तोंडावर
अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह शेतमजूर प्रचंड अडचणीत आहे त्यामुळे मजुरीच्या विवंचनेत अनेक शेतमजुरांची दिवाळी झाली नाही.


अशा सर्व दिवाळीच्या आनंदापासून खरोखर उपेक्षित आणि हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गोर- गरीबांना सोबत घेऊन जनसंग्राम सामाजिक संघटनेने दिवाळी साजरी केली.


संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे, माजी ग्रा.पं. सदस्य सुधाकर पूना भंगाळे,विजया भंगाळे,संघटनेच्या सचिव सौ.मनिषा ठाकरे,निंभोरा युवक बिरादारीच्या अध्यक्षा धनश्री ठाकरे व सचिव अशपाक पटेल,दस्तगिर खाटीक आदींच्या 
हस्ते सर्व अडचणीतील शेतमजूर महिला व लहान मुलांना फराळ आणि साड्या-पातळ वाटप करण्यात आले.

निंभोरा येथील सरला महाले, रुखमाबाई महाले, रेखा मोरे,जाऊ महाले,पद्ममाबाई मोरे,विमल गाढे,निर्मला मसाणे,गयाबाई मोरे, कल्पना वाघ,सुमन मोरे,सुमन महाले,आशा मोरे,लता तायडे, सुनीता महाले,सुनीता मोरे, जिजाबाई सावळे,निता तायडे, सखुबाई मोरे,शाहीन खाटीक,
संजूबाई मोरे,शहनाज पटेल, कालाबाई पटेल,लता महाले, अलका महाले,बेबाबाई पोहेकर, शीलाबाई लोखंडे आदी शेतमजूर जनसंग्रामच्या उपक्रमात सहभागी झाले. 

जनसंग्राम व निंभोरा युवक विकास बिरादारीच्या निलेश लोखंडे,शाकिर खाटीक,सागर महाले,इसाक पटेल, राहुल गाढे,विनोद मसाने, रवींद्र मोरे,आकीब खान,सिद्धार्थ महाले,शाहरुख खाटीक,योगेश महाले, संतोष मसाने,योगेश कोळी, मनोज महाले,सुभाष मोरे,रिजवान पटेल,आफताब खाटीक,सुनिल सुतार आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध