Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

एस टी बस चालकाला बेदम मारहाण,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल



शिरपूर (प्रतिनिधी) दुचाकी वाहनाला साईड न दिल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर चोपडा रस्त्यावर हिसाळे येथे घडली आहे. सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगाराची एमएच २०/बीएल-११९१ क्रमांकाची बस चोपडा येथून प्रवाशी घेऊन शिरपूरकडे निघालेली बस रात्री ९ वाजेच्या सुमारास हिसाळे येथील स्थानकावर प्रवासी उतरवत असतांना मागून आलेल्या दुचाकीवरून दोन जण उतरून बस चालक संदीप दिलीप पाटील वय ३६ रा.अंचाळे ता.जि. धुळे,हमु फुलेनगर शिंगावे ता.शिरपूर यास शिवीगाळ करीत चालक सीट वरून खाली रस्त्यावर ओढत तोंडावर,पोटात, छातीवर, डोक्यावर दोघांनी बेदम मारहाण केली.त्यात चालकाचे कपडे फाटले व डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.वाहक व जमलेल्या लोकांनी दोघांच्या तावडीतून चालकास सोडविले होते.त्यानंतर संशयित घटनास्थळा वरून पसार झाले.भयभीत झालेल्या अवस्थेत चालक व वाचकाने बस थाळनेर पोलीस ठाण्यात आणली.थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात चालकास उपचारार्थ दाखल करण्यात आले. बस चालक संदीप दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून थाळनेर पोलीस ठाण्यात निलेश भिका पाटील व चंद्रशेखर उर्फ बबलू भोलेश्वर पाटील दोघे रा.हिसाळे ता.शिरपूर जि. धुळे यांच्या विरोधात गुरंन ४७/२०१९ भादवी कलम ३५२, ३३२, १८६, ३२५,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध