Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

भाजपच्या बंडखोरांना समजावण्याचे प्रयत्न असफल रंधे परिवाराच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष



शिरपूर:प्रतिनिधी:राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातील बंडखोरीला उधाण आले आहे. सर्वच पक्ष बंडखोरीचा फेऱ्यात सापडले आहेत. आयत्यावेळी आयामांना दिलेले स्थान  बंडखोरीचे प्रमुख कारण आहे. यात प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील बंडखोरांना शांत करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक माननीय नामदार गिरीश महाजन यांना आणि मंत्री आमदार नामदार जयकुमार रावल यांना सोपवण्यात आले होते. दरम्यान जयकुमार रावल यांनी कार्यकर्ता बैठक घेऊन भाजपच्या नाराज गटाला समजाने साठी व संबोधित करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही बैठक स्थगित करावी लागली होती. यानंतर समर्थकांत मार्फत व दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचे काम सुरू होते. नामदार गिरीश महाजन हे देखील धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी बंडखोरांचे बंड शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांना धुळे येथील भाजपच्या बंडखोर उमेदवार माधुरी बाफना त्यांची समजूत काढण्यात यश आले असल्याचे वृत्त समोर येतात. मात्र शिरपूर तालुक्यातील बंड शांत करण्यात त्यांना अपयश आलेले आहे. पक्षाकडून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांच्या गटाकडून मनधरणी चे सर्व प्रयत्न असफल झाले असून मी ही निवडणूक लढवणारच या निर्णयावर डॉक्टर जितेंद्र ठाकूर ठाम असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत असल्यामुळे वेगवान घडामोडी घडत आहेत मात्र आज सकाळपासूनच डॉक्टर ठाकूर अज्ञात ठिकाणी असून त्यांच्या भ्रमणध्वनी स्वीच ऑफ मोडवर आहे. त्यामुळे शिरपूर तालुक्यात होणारी विधानसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध अपक्ष विरुद्ध इतर पक्ष अशी रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. डॉक्टर ठाकूर यांनी मंत्री गटाला स्पष्ट शब्दात सांगितले आहे मी भाजपच्या विरोधात नाही, निवडून आलो तरी माझी निष्ठा भाजपशी कायम असेल त्यामुळे आपण मला माफ करावे ही निवडणूक मी माझ्यासाठी नव्हे तर शिरपूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या हक्कासाठी लढत असून जनता माझ्यासोबत असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
रंधे परिवाराच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
सात ते आठ वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीचे पाय मुळे या तालुक्यात भक्कम करण्याचे काम डॉक्टर ठाकूर    सोबत जर कोणी केली असेल त्याचे सर्व श्रेय जाते ते रंधे परिवाराला. रंधे परिवाराने सत्तासंघर्ष सहन करून भाजप पक्षाला या तालुक्यात खऱ्या अर्थाने जीवनदान देण्याचे काम केले. अनेक योजना राबवल्या, अनेक शासकीय योजनांचा लाभ गरिबांना मिळवून दिला खऱ्या अर्थाने पक्ष वाढवण्याचे काम रंधे परिवाराने केले. अनेक ग्रामपंचायती असो, स्वायत्त संस्था असो सहकारी संस्था असो सर्व ठिकाणी आपली ताकद त्यांनी दाखवली. या सर्व अभियानात तालुक्यातील जनतेने त्यांना मोलाची मदत केली. मात्र आता राजकारणाच्या बदलत्या समिकरणा नुसार' रंधे परिवारावर फार मोठे धर्मसंकट आले असून अग्निपरीक्षा कशी पार करावी मग त्यांना दिसत नाही आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षनिष्ठा ठेवा, पक्षासाठी काम करा, पक्षाच्या आदेशाचे पालन करा असा आदेश त्यांना वरिष्ठांकडून होत आहे, दुसरीकडे जनतेचा दबाव त्यांच्यावर वाढत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही दबावाला बळी पडू नका आणि राजीनामा देऊन मोकळे व्हा अशी भूमिका घेण्यासाठी जनता त्यांच्यावर दबाव करत आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत आपण पक्षाची साथ द्यावी की  जनतेची या द्विधा मनस्थितीत रंरंधे  परिवार सध्या दिसत आहे. कोणाचीही  साथ सोडणे इतके सोपे नाही. पक्षाला मदत केली जनता नाराज होईल, त्याने त्याच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्ष नाराज होईल, त्यामुळे आपली नेमकी भूमिका काय असेल याचा विचारविनिमय सुरू आहे आपण पक्षनिष्ठा ठेवावी, तटस्थ भूमिका घ्यावी जनतेच्या समाधानासाठी बंडखोरीच्या लाटेवर स्वार व्हावे यातून कोणता निर्णय घ्यावा यावर राजकीय  भविष्य अवलंबून आहे त्यामुळे येत्या काळात रंधे परिवार काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध