Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९

असर फाऊंडेशन तर्फे सातपुडा रांगेतील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी .







प्रतिनिधी अजीज शेख :रावेर:दिवाळी हा सन सर्व जण मोठ्या उत्साहाने व आतषबाजी करून साजरा करतात परंतु आदिवासी मुलं आणि मुली त्यांच्या आर्थिककते नुसार दिवाळीचा आनंद घेताच येत नाही.निसर्गाने हिरवाई शालू ने पांघरलेला सातपुडा पर्वत हा दिवाळीत नटून दिसतो पण मुलं हे देवा घरची फुल असतात म्हणून फुल हे दिवाळीत फुलले दिसावे व आनंदीत दिसावे म्हणुन सायपुडा पर्वत पायथ्याशी स्थित सायबु अमरसिंग पाडा व गारबर्डी धरण वस्ती येथे नुकत्याच नोंदणी झालेल्या असर फाऊंडेशन(आधार सामाजिक उत्तरदायित्व संशोधन संस्था) ने प्रथम  आदिवासी मुला मुलींना दिवाळी भेट नवीन ड्रेस ,साबण,टूथ ब्रश ,टूथपेस्ट ,नोट बुक,पेन पेन्सिल,रबर,शार्पनर ,शेवचुडा,मोहनथाल असे किट देऊन त्यांच्या हस्ते बॅनर चे पूजन केले . सरदार जी जी च्या 2007 च्या 12 वी च्या बॅच ने संपूर्ण निधी उभारून  दिवाळी असर च्या माध्यमातून हा उपक्रम राबविला व दिवाळी आनंदात साजरी करतांना आदिवासी लहान मुलांचा उत्साह दिसून आला.असर चे हरिष लोहार,योगेश पाटील,अजित जमादार,महेश महाजन,तुषार निंबाळकर,शशांक भीळे ,राजेंद्र पाटील,प्रदीप सूर्यवंशी,मुकेश पाटील,मेघराज शेगावकर,अमोल तायडे,निलेश नंन्नवरे.हे उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध