Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

शिवसेनेचे जळगावजिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिला पदाचा राजीनामा.........





जळगाव प्रतिनिधी योगेश भोई.
शिवसेनेचे जळगावजिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी  आपल्या  पदाचा राजीनामा.पक्षश्रेष्ठीनकडे दिला आहे त्यानी मुक्ताईनगर मधुन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.महायुतीचे आधिक्रुत उमेदवार व एकनाथराव खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना पाठींबा न दिल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर मतदार संघातुन उमेदवारी करण्यासाठी ईछूक होते.त्यांनी तशी आपेक्षा वेळोवेळी जाहिर केली होती भाजपाचे जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांना चंद्रकांत पाटील यांचा उघडपणे विरोध होता.गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही एकनाथराव खडसे यांची सुन खासदार रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता.नंतर शिवसेना पक्षाने आदेश दिल्यावर हि त्यानी विरोध केला नसला तरी प्रचारात सक्रियताही घेतली नाही.यांच्या परिणामी चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत आता विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी केली आसुन शिवसेनेचा राजीनामा दिला आहे.तसेच राष्ट्रवादी.कॉंग्रेस व मित्रपक्षाचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाप्रमुख अँड.रविंद्रभय्या पाटील यांनी आज आपला उमेदवारी आर्ज मागे घेत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना जाहिर पाठिंबा दिला आहे आता चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी आघाडीचे  प्रुस्कुत उमेदवार या मतदारसंघात राहणार आहेत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध