
![]() |
‘सत्तास्थापनेत घाई करुन चालणार नाही. थंड डोक्यानं विचार करावा लागेल,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ठरल्याप्रमाणे सत्तावाटप झाले तर ५ वर्ष महाराष्ट्रात स्थिर सरकार असेल, ‘सर्व काही ठरल्याप्रमाणे व्हावं,’ असं संजय राऊत यांनी म्हणत मुख्यमंत्रीपदावर भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना आग्रही मागणी करत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
ही बातमी पण वाचा : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नव्या सरकारचा शपथविधी; सेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच
यावेळी राऊत यांनी युतीचंच सरकार स्थापन होणार असं म्हणत फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ऑफर देण्याच्या गोष्टी करत राहतील. मात्र, आम्ही आजही भाजपसोबत युतीत आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकार युतीचं स्थापन होणार असं म्हटलं आहे. फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर या केवळ अफवा असल्याचं राऊत म्हणाले. ते म्हणाले, “जर असं कुणी म्हणत असेल तर ते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख नेते संपर्कात असल्याचं म्हणायचेच बाकी आहे. या सर्व अफवा आहेत. जर असं असेल तर माझ्याही संपर्कात भाजपचे ६० आमदार आहेत. त्यांचे सकाळपासून फोन येत आहेत आणि ते सत्ता स्थापनेविषयी विचारणा करत आहेत.” असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “मी अजित पवारांचं भाषण ऐकलं. त्यांनी एका राजकीय नेत्याप्रमाणे आपलं भाषण केलं. शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. त्याचीच झलक अजित पवार यांच्या भाषणात दिसली.” असेही ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा