Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

ऊस लागवडीसाठी थाळनेर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन



शिरपूर ( प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शेतकऱ्यांना मध्यप्रदेशातील ठीकरी साखर कारखान्यामार्फत नवीन ऊस लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील होते.

यावेळी पीक ठीकरी साखर कारखान्याचे डॉ. कृपालसिंग राजपूत यांनी शेतकऱ्यांना नवीन ऊस लागवड करताना नर्सरीतुन उसाचे महागडे रोप घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी शेतात कमी खर्चात उसाचे रोप कसे तयार करावे.उसाचे रोप शेतकऱ्यांनी तयार करताना काय काळजी घ्यावी.तसेच उसाच्या डोळ्यास बुरशीनाशक व कीटकनाशक द्रावणात बुडवून लावावे. शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना काय आंतर ठेवावे.शेतकऱ्यांनी उसाची लागवड पट्टा पद्धतीने केल्यास साखर कारखानाना ऊस तोडण्यास मशीन ने सोयीस्कर जाते.त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व उत्पन्न वाढते.शेतकऱ्यांनी ऊस पिकास कुठली खते केव्हा लावावी .शेतकऱ्यांनी ऊस पिकास कुठली खते केव्हा लावावी व  विविध रोग,तणनाशक याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ करता येते. 

यावेळी पिक सोसायटीचे व्हाईस चेअरमन ढोमन बागुल,सचिव सुरेश शेटे, संचालक कैलास वाडीले,उदयसिंग जमादार, पत्रकार हेमंत चौधरी,युवराज जमादार,रवींद्र मराठे, लालसिंग जमादार, भूपेश चौधरी, हरपाल जमादार प्रदीप राऊळ,महेंद्र जमादार, पुंडा पवार,महेश जमादार शेखर निळे,आनंद सिंग जमादार,गणेश पाटील व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पृथ्वीराज राजपूत यांनी परिश्रम घेतले.
--------------------------------------------------------------------------------

आर.सी.पटेल आय.एम. आर.डी. तर्फे उत्कृष्ट संदेश स्पर्धा २०१९ संपन्न



शिरपूर (प्रतिनिधी) येथील आर.सी.पटेल आय.एम. आर.डी. मध्ये शिरपूर, धुळे, शिंदखेडा, चोपडा, दोंडाईचा, पाचोरा, अमळनेर तसेच तालुक्यातील विविध गावातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांसाठी उत्कृष्ट संदेश  स्पर्धा २०१९ आयोजित करण्यात आली होती. 

उत्कृष्ट संदेश स्पर्धा ही नऊ तालुक्यातील एकूण ३८ विविध महाविदयालयात नि:शुल्क घेण्यात आली.या स्पर्धेत ४५३४ विदयार्थी सहभागी झाले होते.सदर स्पर्धा ही मराठी,हिंदी,इंग्रजी या तिन्ही भाषांमधून घेण्यात आली.सहभागी असणाऱ्या प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम उत्कृष्ट तीन संदेशांची निवड करण्यात आली.निवड झालेल्या प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विदयार्थ्यांना आय.एम. आर. डी. शिरपूर परिसंस्थेतर्फे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.स्पर्धेचे आयोजन दरवर्षी आय.एम.आर.डी. परिसंस्था करत असते. या विशेष शिक्षक सन्मान आयोजनाबद्दल विविध कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्य,शिक्षक व विदयार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन व  यशस्वीतेसाठी आय.एम. आर.डीचे उपसंचालक प्रा. मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभाग प्रमुख डॉ.मनोज पटेल,पदवी विभाग प्रमुख प्रा.तुषार पटेल, प्रा.मानसी वैद्य, प्रा.योगेश सेठीया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व  परिसंस्थेतील बी.एम.एस., बी.बी.ए. व बी.सी.ए.पदवी अभ्यास क्रमातील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील १९० विदयार्थी यांनी विशेष परीश्रम घेतले.या बाबत माजी मंत्री अमरिश पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरु डॉ. के.बी. पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी कौतुक केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध