Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

आमदार काशिराम पावरा यांची अर्थे, भोरटेक व परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी सुरुच, शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी सक्रीय.





प्रतिनिधी:शिरपूर - तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी ग्रामीण भागातील दौरा सुरुच ठेवला आहे. पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सक्रीय झाले आहेत. माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल हे देखील या सर्व मोहिमेत संपर्क ठेवून आहेत.

आमदार काशिराम पावरा यांनी सोमवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता अर्थे, भोरटेक व परिसरातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकरी बांधवांशी संपर्क साधला.
आमदार काशिराम पावरा यांच्यासोबत स्वीय सहाय्यक अशोक कलाल, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील,  संजय पाटील, प्रशांत पाटील, अर्थे येथील माजी पं.स.उपसभापती दिपक गुजर, सरपंच अनिल पाटील, भगवान गुजर, डॉ. शशिकांत पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, नवलसिंग परदेशी, अविनाश गवळे, अविनाश पाटील, अनेक पदाधिकारी, शेतकरी बांधव तसेच भोरटेक येथील अशोक पाटील, सुरेश पाटील, भुलेश्वर पाटील, हिंमतराव जाधव, मच्छिंद्र जाधव, शरद जाधव, रघुनाथ चौधरी, भुलेश्वर जाधव, रतिलाल जाधव, अनेक शेतकरी बांधव तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार काशीराम पावरा यांनी तिन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेवून सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कडक सूचना दिल्या होत्या. त्याबाबत पाठपुरावा सुरु ठेवून कोणीही शासनाच्या आर्थिक लाभापासून वंचीत राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध