Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

आमदार काशिराम पावरा यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना, शिरपूर तालुक्‍यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन शेतकरी बांधवांना दिला धीर.






शिरपूर:प्रतिनिधी :तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी ग्रामीण भागात पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकरी बांधवांना धीर दिला. तसेच सरसकट पंचनामे करुन नुकसानग्रस्त सर्व शेतकरी बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्या संदर्भात आजही आदेश दिले.



आमदार काशिराम पावरा यांनी रविवारी दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जातोडे, वनावल, बलकुवे व परिसरातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकरी बांधवांना धीर देवून सर्वांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
आमदार काशिराम पावरा यांच्यासोबत स्वीय सहाय्यक अशोक कलाल, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, विक्की चौधरी, माजी पं.स.उपसभापती जगतसिंग राजपूत, माजी पं.स.सदस्य भरत पाटील, मनोहर देवरे, जयसिंग राजपूत, माजी जि.प.सदस्य उदेसिंग राजपूत, सरपंच जितू भिल, डी.जे.राजपूत, नंदलाल पाटील, नाना गुरुजी, प्यारेलाल महिरे, पापा गिरासे, यासिग गिरासे, कांतीलाल धनगर, अविनाश पाटील, राजेंद्र चौधरी, प्रकाश चौधरी, विनोद पाटील, नितीन बेलदार, योगेंद्रसिंग सिसोदिया, सुभाष राजपूत, लोटन धनगर, भटेसिंग राजपूत, रविंद्र राजपूत, सुभाष धनगर, नथा कुंभार, दगा तिरमले, सुरेश कोळी, पप्पू कोळी, कृष्णा तिरमले, लोटन राजपूत, बखतसिंग राजपूत, अनेक पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी आमदार काशीराम पावरा यांनी तहसील कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेवून सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कडक सूचना दिल्या होत्या. शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न शेती आहे. तालुक्यात अतिवृ्टीने मोठे नुकसान झाले आहे. मनापासून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे सर्व प्रकारचे पिकांचे पंचनामे करावे. योग्य तो लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावे. सर्व अधिकारी, सर्कल, ग्रामसेवक, तलाठी यांनी योग्य ते पंचनामे करावे, सतर्क राहून सर्वांनी काम करावे. असेही त्यांनी पुन्हा आज सांगितले. यानंतर आमदार काशिराम पावरा हे उद्या तालुक्यातील काही गावांना भेटी देणार आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध