Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

जामठी येथे दारुबंदीविरोधात तरुण एकवटले आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल तरुणांच्या पाठिशी...





जामठी (बोदवड)प्रतिनिधी समिर पिंजारी 
तालुक्यातील दुसरी बाजारपेठ असलेल्या जामठी गावात दारु विक्रेत्यांचा वेढा पडला असुन अनेक तरुण व्यसनांच्या अधिन जात आहेत. गावालगत ९ ठिकाणी देशी दारुचे अड्डे आहेत त्यामुळे बेकायदेशीर दारु व्यवसाय फोफावला आहे. गावात बेकायदेशीर सरार्स दारुव्यवसायाला ऊत आलाय. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दारुच्या अधिन जात असुन ; गावात घरातील कर्त्या व्यक्तीला दारुमुळे प्राणाला मुकावे लागल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. अवैध धंद्यावर पोलिस प्रशासन कानाडोळा करतात तरी कसा? असा प्रश्न गावकरी विचारत आहे. संबंधित दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन बोदवड पोलिस स्थानकात जामठीकरांनि दिले. आता या निवेदनाचि दखल पोलिस प्रशासन किती तत्परतेने घेते यावर सर्वत्र ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे. पोलिस अधिक्षक, आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल,  उत्पादन शुल्क अधिकारी,  तहसिलदार  ,सरपंच,  ग्रामसेवक यांना प्रत रवाना करण्यात आल्या आहेत.

गावातील तरुणांनि मतदार संघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांना संपर्क केला. सदरील प्रकाराचि माहिती त्यांना कळविली असता ; तुम्ही प्रथम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन त्याचि सत्यप्रत घ्या ,  बाकी मि पाहतो असे म्हणत तरुणांच्या पाठिशी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल ऊभे राहिले.

निवेदनावर नारायण पाटिल, सागर पाटिल,  संदिप पाटिल, विकास पाटिल, मयुर पाटिल,  निलेश पाटिल, दिपक पाटिल, पवन महाजन,  विठ्ठल लोहार,  सचिन पाटिल,जितेंद्र मानकर,  उमेश मानकर, इश्वर पाटिल,  सागर गायकवाड, यांच्यासहित ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध